इंजि मनोज गायकवाड यांना करमाळा तालुक्यातून मताधिक्य मिळवून देणार -अमित घोगरे
करमाळा तालुका प्रतिनिधी-अतुल वारे पाटील
पुणे पदवीधर मतदार संघातून उभे असलेले संभाजी ब्रिगेडचे अधिकृत उमेदवार इंजिनिअर मनोज गायकवाड यांना करमाळा तालुक्यातून मताधिक्य मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची माहिती संभाजी ब्रिगेड चे करमाळा तालुका अध्यक्ष अमित घोगरे यांनी AJ 24 tas न्युज प्रतिनिधीशी बोलताना दिली .
यावेळी बोलताना अमित घोगरे म्हणाले की गेल्या तीस वर्षापासून शिवराय- शाहू -फुले -आंबेडकर विचारधारा घेऊन समाजामध्ये सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी संभाजी ब्रिगेड काम करत आहे. शाश्वत परिवर्तनासाठी राजकीय सत्ता महत्त्वाची आहे परंतु स्वातंत्र्यानंतर सत्ता ही केवळ काही घराण्यांची मालकी झाली असून राज्यकर्ते व भांडवलदार यांच्या संगनमतातून सर्वसामान्य जनता नागवली जात आहे.पदविधरांचे प्रश्न घेऊन इंजिनिअर मनोज गायकवाड गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असून अनेक आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी सुशिक्षित पदवीधर युवकांना न्याय मिळवून दिला आहे. सर्वसामान्य कुटुंबातुन ते आले असल्यामुळे पदवीधरांच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. पदवीधरांचे प्रश्न विधिमंडळात मांडण्यासाठी उच्चशिक्षित तसेच तरुण उमेदवारांची गरज असून इंजिनिअर मनोज गायकवाड हे अतिशय सक्षम उमेदवार आहेत. करमाळा तालुक्यात अनेक पुरोगामी संघटना कार्यरत असून या सर्वांना सोबत घेऊन इंजिनिअर मनोज गायकवाड यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करत असल्याची माहिती अमित घोगरे यांनी यावेळी दिली .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा