*टेंभुर्णी येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर त्यांच्या उपस्थित भाजपच्या आढावा बैठकीचे आयोजन*
करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील
पुणे पदवीधर मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी, आर.पी.आय. रयत क्रांती, रा. स. प. चे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचाराच्या निमित्ताने करमाळा व माढा तालुक्यातील मतदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक दिनांक - 19/11/2020 रोजी सकाळी ठीक 9 ते 11* या वेळेमध्ये टेंभुर्णी येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
या बैठकीसाठी माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख, माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख, लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, विधानपरिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संग्राम देशमुख तसेच सोलापूर जिल्हा भाजपा अध्यक्ष श्रीकांत देशमुख उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
तरी करमाळा व माढा मंडळातील आजी माजी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सकाळी ठीक 9:00 वाजता पुष्पक मंगल कार्यालय,करमाळा रोड टेंभूर्णी येथे आढावा बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गणेश चिवटे - अध्यक्ष करमाळा तालुका भाजपा,
योगेश बोबडे - अध्यक्ष माढा तालुका भाजप यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा