*टेंभुर्णीतील सनराईज इंग्लिश मीडियम स्कूल ला दिल्ली येथील सी.बी.एस. ई. बोर्डाची मान्यता*
टेंभुर्णी प्रतिनिधी
टेंभुर्णी येथील श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ या संस्थेच्या सनराईज इंग्लिश मीडिअम स्कूल ला नुकतीच दिल्ली येथील सी.बी.एस.ई. बोर्डाची मान्यता मिळाली आहे. सी.बी.एस.ई. बोर्डाच्या मान्यतेसाठी आवश्यक असणारे सर्व निकष ज्यामध्ये तज्ञ शिक्षक वर्ग, सुसज्ज व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने असलेली इमारत, क्लासरूम साइज, ग्रंथालयातील आवश्यक पुस्तक संख्या, सायन्स लॅब, खेळाचे मैदान व साहित्य यामध्ये सनराइज् स्कूल परिपूर्ण असल्यामुळे व बोर्डाच्या इन्स्पेक्शन कमिटीने तसा अहवाल दिल्यानंतर दिनांक 28/10/2020 रोजी सी.बी.एस.ई. बोर्डाने जाहीर केलेल्या पत्रानुसार स्कूल मान्यता क्रमांक 1131023 या क्रमांकाने सनराईज स्कूल सी.बी.एस. ई. बोर्डशी संलग्न करण्यात आले आहे.
माढा तालुक्यातील सनराईज स्कूल ही उत्कृष्ट नियोजन व प्रत्येक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या वैशिष्ट्यांमुळे एक आदर्श शाळा म्हणून परिचित आहे त्यामुळेच आज संपूर्ण माढा तालुक्यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी संख्या ही याच शाळेमध्ये आहे. सन 2019 मध्ये जिल्ह्यातील आदर्श शिक्षण संस्था म्हणून या शाळेला पुरस्कार प्राप्त झालेला असतानाच आता सी.बी.एस.ई. बोर्डाची मान्यता मिळाल्याने या स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
आमच्या संस्थेत प्री-प्रायमरी ते इ. बारावी (सायन्स,कॉमर्स), प्रत्येक क्षेत्रातील करिअर फाउंडेशन - एमपीएससी/यूपीएससी स्टडी सेंटर, इ.7 वी ते 10 वी साठी आय.आय.टी. फाउंडेशन कोर्स, इ. 11 वी 12 वी साठी जेईई/नीट/एनडीए/नाटा इ. चे शिक्षण उपलब्ध असून माढा तालुका हा ग्रामीण भाग असला तरी येथील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे या हेतूने आज पर्यंत या शाळेची वाटचाल असून, आमच्या शाळेचा विद्यार्थी भविष्यातील कोणत्याही परीक्षेसाठी मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या व सर्वात महत्वाचे म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे यासाठी आम्ही सुरुवातीपासूनच कार्य करीत आहोत. आमच्या संस्थेतील प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तकी ज्ञानाबरोबरच कला, क्रीडा व विविध उपक्रमाच्या माध्यमातून सक्षम बनवले जाते असे स्कूलच्या सचिव सौ सूरजा बोबडे यांनी सांगितले.
संस्थेचे चेअरमन श्री योगेश बोबडे यांनी सांगितले की या स्कूलने राबवलेल्या अनेक चांगल्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्व दृष्टीने विकास होत असून आमच्या स्कूलचा प्रत्येक विद्यार्थी भविष्यात त्याने निवडलेल्या क्षेत्रामध्ये, करिअरमध्ये यशस्वी झालेला पहायला मिळेल याची आम्हाला खात्री आहे. आज सगळीकडे स्पर्धेचे युग आहे त्यामुळे भविष्यातील स्पर्धा परीक्षेसाठी व त्यातील यशासाठी सी.बी.एस. ई. बोर्डाची मान्यता मिळाल्याचा या विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे ओलंपियाड/ एन.टी.एस.इ./ जेईई/ नीट यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये आमच्या स्कूलचे अनेक विद्यार्थी भविष्यात यशस्वी झाल्याचे दिसेल असेही त्यांनी सांगितले.
या स्कूलचे प्राचार्य प्रभाकर सर कॉर्डिनेटर सोनटक्के सर स्कूलचे सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनी या मान्यतेबद्दल आनंद व्यक्त केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा