Breaking

गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२०

शासनाने संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचे थकित अनुदान त्वरित द्यावे - आ. बबनदादा शिंदे


शासनाने संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचे थकित अनुदान त्वरित द्यावे - आ. बबनदादा शिंदे 

10 दिवसांत अनुदान देण्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे आश्वासन

माढा / प्रतिनिधी- राजेंद्र गुंड सर
- जुलै 2020 पासून संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचे थकित अनुदान शासनाने त्वरित द्यावे अशी मागणी माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे करून दुरध्वनीवरुन संपर्क साधला असता त्यांनी येत्या 10 दिवसांत थकित अनुदान मिळेल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

या संदर्भात आ. बबनदादा शिंदे यांनीदिलेल्या पत्रात म्हटले आहे की, समाजातील गोरगरीब व वंचित घटकांसाठी शासनाने अनेक वर्षांपासून संजय गांधी व श्रावणबाळ योजना सुरू केली आहे परंतु मागील चार महिन्यांपासून हे अनुदान सोलापूर जिल्ह्यातील गरजू लाभार्थ्यांना मिळाले नाही त्यामुळे त्यांची आर्थिक कुचंबणा होत आहे तसेच दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे त्यामुळे सणासाठी त्वरित थकित अनुदान मिळणे गरजेचे आहे.या बाबीचा शासन स्तरावर विचार करून त्वरित योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी फोनवरून आमदार बबनराव शिंदे यांनी सविस्तर चर्चा करून याबाबतच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले तेंव्हा मंत्र्यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करुन सर्व गरजू लाभार्थ्यांना थकित अनुदान देण्याचे आश्वासन दिले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा