Breaking

बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२०

एकोणवीस नोव्हेंबर या दिवसी उदगीर व जळकोट तालूक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत*



*एकोणवीस नोव्हेंबर या दिवसी  उदगीर व जळकोट  तालूक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत*



*लातूर जिल्हा प्रतिनिधी   जीवन भोसले* 



*उदगीर*/ *लातूर*/:उदगीर  व जळकोट तालुक्यातील  ग्रामपंचायत सरपंचपदांच्या आरक्षणाची  सोडत गूरूवारी (ता.19( रोजी उपजील्हाधिकारी प्रविण मेगशेट्टी यांच्या हस्ते काढण्यात येनार असल्याची माहीती  निवडणूक   नायब  तहसीलदार  संतोष गुट्टे यांनी दिली आहे गुरूवारी  सकाळी साडेदहा  वाजता उदगीर तालुक्यातील 88ग्रामपंचायती, तर  दुपारी तीन वाजता जळकोट तालूक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची  सोडत काढण्यात येनार आहे.
संबंधित गावच्या प्रतिनिधींसमोर या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे 
उदगीर  तालुक्यातील 88ग्रामपंचायतींपैकी 61 ग्रामपंचायतींच्या  निवडणुकीची तयारी पुर्ण झाली आहे.
तालुक्यातील मुदत संपलेल्या 61 ग्रामपंचायती अंतर्गत प्रभाग  रचना , प्रभागनिहाय  आरक्षण , मतदार  याद्यांचे काम  टाळेबंदीच्या  (लाँकडाऊन) च्या अगोदरच पुर्ण  झाले असुऩ  लाँकडाऊन मुळे  ही प्रक्रिया  स्थगीत झाली होती . मात्र  आता निवडणूक आयोगाने  या  निवडणूकीसाठी प्रक्रिया सुरू केली  असून  ग्रामपंचायतीच्या  सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्याच्या तारखा निश्चित केलेल्या आहेत.
 
त्यानुसार गुरूवारी उदगीर व जळकोट तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची  सोडत काढण्यात येणार आहे .
 उपजील्हाधिकारी मेंगशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली  व उदगीरचे  तहसीलदार श्री.  रामेश्वर गोरे व जळकोटचे  तहसीलदार श्री. कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित गावचे  लोकप्रतिनिधींसमोर  ही प्रक्रिया पुर्ण करण्यात येणार  आहे .
 बिहार व इतर  राज्यातल्या  निवडणूकीचा  कार्यक्रम  जाहीर झाल्यानंतर  ग्रामपातळीवर मुदत संपलेल्या  ग्रामपंचायतींचे अनेक  ग्रामस्त  या सरपंच पदाच्या आरक्षणाच्या  सोडतीकडे लक्ष ठेऊन होते. 
उदगीर  तालुक्यातील आरक्षणाची सोडत कधी होईल या कडे  सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. या ग्रामस्थांची प्रतिक्षा आता संपली  असून  दिवाळीनंतर लगेच  ही सोडत पुर्ण  होनार आहे  अशी माहिती देण्यात आली .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा