गोरगरीब कुटुंबाच्या वेदना ढोले कुटुंबीयांनी जाणल्या - डॉ.लक्ष्मणराव आसबे
** बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील शेकडो कुटुंबीयांना आनंद भेट वितरण
तालुका इंदापूरदीपावली आनंद भेट कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ.लक्ष्मणराव आसबे व मान्यवर.
बावडा (प्रतिनिधी):गरीब कुटुंबात राहून गरीबी च्या झळा, वेदना ज्यांनी सोसल्या आहेत.आशा ढोले कुटुंबीयांनी या लाखेवाडी परिसरातील शेकडो उपेक्षित,गरीब कुटुंबीयांना दिपवाली सणानिमित्त आनंद भेट वितरण कार्यक्रमामुळे, राज्यावर कोरोना तसेच आपत्तीचे संकट असताना देखील गरीबांना गोड घास खाता येणार असल्याचे गौरवोद्गार कामधेनू सेवा परिवाराचे प्रमुख डॉ.लक्ष्मणराव आसबे यांनी काढले.
जय भवानी गड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी तालुका इंदापूर या संस्थेचे संस्थापक श्रीमंत ढोले यांनी आयोजित केलेल्या दिवाळी आनंद भेट विशेष कार्यक्रमात कामधेनू सेवा परिवाराचे प्रमुख डॉक्टर लक्ष्मणराव आसबे बोलत होते.बावडा चे सहाय्यक पोलीस निरीक्षक बि.एन.लातूरे,इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते, संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रकला ढोले,संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे,व पत्रकार संघाचे मुख्य सचिव सागर शिंदे,संपर्कप्रमुख महेश स्वामी,संदिप सुतार,सोमनाथ ढोले,भिमराव आरडे,उदयसिंह जाधव,रामदास पवार,शौकत तांबोळी,शिवकुमार गुणवरे,आदम पठाण,भिमसेन उबाळे,राजेंद्र भोसले,अक्षय आरडे,धनजंय कळमकर,तसेच लाखेवाडी गावचे सरपंच सोमनाथ भिंगारदिवे,यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.आसबे म्हणाले की, गोरगरिबांच्या समस्या ज्यांना कळतात ते खर्यां अर्थांने सामाजिक जिवणात यशस्वी होतात.यासाठी दानत हि अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.अशीच गोरगरिबांच्या अडचणी दुख: जाणाणारा ढोले परीवार असुन,आपले धन सुध्दा उत्तम व्यवहारात गुंतवणूक करण्यासाठी सज्ज असतात.ज्या लोकांची मने सर्व दृष्टीने तृप्त झालेले आहेत.तेच लोक दानधर्म करत असतात त्यामुळे याचे सर्व श्रेय त्यांच्या माता-पित्यांना जात असते.एका गरीब कुटुंबातून जन्म घेऊन,गरिबांच्या हजारो मुलाबाळांना अद्ययावत शिक्षण प्रणाली देण्याची भूमिका श्रीमंत ढोले यांनी घेतलेली आहे.
माणसाने वासनेला जाळून बहिण-भावाचे नाते निर्माण केले पाहिजे.तरच खऱ्या अर्थाने जीवनात यशस्वी होता येते.यासाठी कामधेनू सेवा परिवार अखंड कार्य करतो आहे.मला सार्थ अभिमान वाटतो की,राज्यातील इतर पत्रकार संघांनी इंदापूर तालुक्यातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामाजिक जाणिवेतून काम करावे त्यामुळे गरिबांच्या जीवनात आनंद प्राप्त होतो,याच पत्रकार बांधव यांच्या संकल्पनेतून ढोले परिवाराने शेकडो कुटुंबियांची दिवाळी गोड केलेली आहे.त्यामुळे या परिवाराला कदापि समाज विसरणार नाही अशीही ग्वाही डॉ.लक्ष्मणराव आसबे यांनी दिली.
यावेळी उपस्थितांचे स्वागत करताना जय भवानी गड विकास प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीमंत ढोले म्हणाले की,संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना मदत करण्याची भूमिका सातत्याने ठेवलेली आहे.तर ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षणात पुढे गेला पाहिजे,यासाठी लातूर पॅटर्न ही संस्था राबवत असून,कमी वयाची संस्था असून देखील राज्यांमध्ये अनेक परीक्षेत प्रथम येण्याचा मान या संस्थेतील विद्यार्थ्यांनी मिळवला आहे.तर कोरोना च्या कालावधीत परिसरातील गावांना स्वच्छ-सुंदर आरोग्य राहण्यासाठी,संस्थेने वेळोवेळी मदत केली आहे.तसेच लाखेवाडी परिसरामध्ये 50 हजार वृक्षलागवड संस्थेच्या माध्यमातून झालेले आहे.आपत्ती ग्रस्त शेतकरी व कोरूना पार्श्वभूमीवर गरीब कुटुंबांचे प्रचंड हाल चालले आहे.त्यामुळे रितीरिवाजाप्रमाणे सालाबाद प्रमाणे दिपवाळी सण या कुटुंबात साजरा व्हावा.या उद्देशाने दिवाळी आनंद भेट मधून सणा साठी लागणारे सर्व साहित्य मोफत वाटप करण्यात आले आहे.आगामी काळात देखील सामाजिक जाणिवेतून काम केले जाईल अशी ग्वाही श्रीमंत ढोले यांनी दिली.
यावेळी उपस्थितांचे स्वागत संस्थेच्या वतीने श्रीमंत ढोले संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले व संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे,यांनी केले तर आभार प्रदिप गुरव यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा