*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार 'डॉ. श्रीमंत कोकाटे' यांच्या प्रचारार्थ सोलापूर जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडच्या वतीने बैठकांचे सत्र सुरु आहे. हि कारखानदारीची निवडणूक नसून पदवीधरांची आहे, पदवीधरांचे प्रश्न विधानपरिषेदेत मांडण्यासाठी प्रविणदादा गायकवाड आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते राहुल भाऊ पोकळे यांच्या नेतृत्वाखाली डॉ.श्रीमंत कोकाटे यांना करमाळा तालुक्यातून प्रचंड मताधिक्य देणार असल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीचे प्रतिनिधी सत्यम सुर्यवंशी यांनी केले.
पुणे पदवीधर मतदार संघातील प्रस्थापित पक्षांच्या कार्यशून्य उमेदवारांना पराभूत करण्याच्या आणि पदविधरांच्या प्रलंबित समस्या सोडवण्याच्या उद्देशाने या निवडणुकीतील सर्वात जास्त उच्चशिक्षित उमेदवार 'डॉ. श्रीमंत कोकाटे' यांच्या जिल्हाभरात कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे.
यावेळी करमाळा तालुक्यातून जास्तीत जास्त मतदान घडवून आणणे, डॉ. कोकाटे यांना जास्तीत जास्त मतदान कसे होईल यासाठी प्रयत्न करणे, सर्व पदविधरांच्या वैयक्तीक गाठीभेटी घेण्यावर भर देणे, प्रत्येक कार्यकर्त्याने आपली जाबबदारी पार पाडणे, बुथसाठी प्रतिनिधी नेमणे, अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे नेते बालाजी गावडे ,राकेश पाटील, सुहास पोळ नानासाहेब पोळ ,सुहास शिंदे, अतुल निर्मळ, निलेश घाडगे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा