माढा तालुक्यातील 82 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर.....
15 जानेवारी 21 रोजी मतदान तर 18 जानेवारी 21 रोजी मतमोजणी व निकाल .....
बेंबळे ।प्रतिनिधी
माढा तालुक्यातील एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या काळात मुदत संपलेल्या ८२ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा अधिक्रत कार्यक्रम शासनाकडून जाहीर झाला आहे. त्यानुसार 15 जानेवारी 21 रोजी मतदान तर 18 जानेवारी 21 रोजी निवडणुकीची मतमोजणी होउन निकाल जाहीर होणार आहेत.
अधिकृत सविस्तर वृत्त असे की माढा तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मंगळवार दिनांक 15 .12 .20 रोजी निवडणुक नोटिशीचे प्रसिद्धीकरण होणार आहे. त्यानुसार तहसील कार्यालय माढा येथे, बुधवार दिनांक 23. 12 .20 ते बुधवार दिनांक 30. 12. 20 पर्यंत ,सकाळी११ वा. ते दुपारी ३वा. पर्यंत उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज मागवणे व सादर करणेत एणार आहेत. गुरुवार दिनांक 31 .12. 20 रोजी सकाळी 11 वा.पासून सर्व अर्जांची छाननी होणार आहे. नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याची तारीख सोमवार दिनांक 4 जानेवारी 21दुपारी तीन वाजेपर्यंत असून याच दिवशी प्रभाग निहाय एकुण पात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होउन , दुपारी तीन नंतर उमेदवारांना चिन्हांचे होणार आहे. शुक्रवार दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7 .30 ते सायंकाळी 5 .30 पर्यंत आवश्यक त्या ठिकाणी मतदान घेण्यात येणार असून सोमवार दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी माढा तहसील कार्यालयामध्ये मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत अशी माहिती माढा तहसीलदार राजेश चव्हाण यांनी दिली आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा