Breaking

शुक्रवार, ४ डिसेंबर, २०२०

टेंभुर्णी :येथील रयत चे एम.आय.पवार यांना पुणे येथे'महात्मा फुले आदर्श राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान


टेंभुर्णी : -येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुलचे सहशिक्षक एम.आय.पवार यांना पुणे येथील अखिल भारतीय साहित्य परिषदेचा 'महात्मा फुले आदर्श राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार नुकताच मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.

हा पुरस्कार अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष शरद गोरे,चित्रपट कलाकार राहुल बळवंत,संमेलनाध्यक्ष सुरेखा पवार व अभिनेत्री विनिता या मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक नुकताच प्रदान करण्यात आला.
यापूर्वी विद्यार्थीप्रिय शिक्षक पवार यांना साहित्य परिषदेचा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार,माढा तालुक्यातील खैराव येथील १५ व्या ग्रामीण साहित्य संमेलनात शैक्षणिक व सामाजिक पुरस्काराने गौरविण्यात आले होते.एम.आय.पवार यांची २२ वर्ष सेवा झाली असून त्यांचे विद्यार्थी शिक्षणाबरोबर वक्तृत्व स्पर्धा,धनुर्विद्या,शिकई मार्शल आर्ट,कराटे स्पर्धा यामधून चमकले आहेत.या पुरस्कारामुळे पवार यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा