औरंगाबाद जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवरील लैगिक अत्याचार प्रकरणी न्याय द्यावा -- सावता परिषदेची निवेदनाद्वारे मागणी.
टेंभुर्णी प्रतिनिधी AJ 24 Taas News Maharashtra
टेंभुर्णी : - औरंगाबाद जिल्ह्यातील थेरगाव ता.पैठण येथे माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अल्पवयीन मुलीवरील लैगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करून पीडितेस न्याय द्यावा अशी मागणी सावता परिषदेच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.
माढा तहसीलदार राजेश चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,पैठण तालुक्यातील घटना अत्यंत संतापजनक असून घृणास्पद आहे.या घटनेने पीडितेचे कुटुंब हादरून गेले असून भयभीत झाले आहे.या घटनेचा सावता परिषद निषेध करीत असून या घटनेतील आरोपींना नवीन कायद्यानुसार कारवाई करून तो खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा द्यावी.यासाठी प्रख्यात वकील अड उज्वल निकम यांची नेमणूक करावी,पीडितेच्या कुटुंबाचे आर्थिक पुनर्वसन करून त्यांना पुरेशे पोलीस संरक्षण द्यावे या मागण्या करण्यात आल्या आहेत.अन्यथा सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात निषेध आंदोलन छेडण्यात येईल.
यावेळी सावता परिषदेचे माढा तालुकाध्यक्ष भारत कुबेर,पांडुरंग घाडगे,हनुमंत भोसले, अशोक कुबेर हे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा