Breaking

मंगळवार, ८ डिसेंबर, २०२०

उत्कृष्ट कोविड वाँरियर पुरस्काराचे वितरण. क्षेत्रीय महानिरीक्षकांच्या हस्ते बेंबळे पोलीस पाटलाचा सत्कार

 
      बेंबळे । प्रतिनिधी              
            बेंबळे गावचे पोलीस पाटील बीभिषण किर्ते यांचा कोरोना कार्यकाळात केलेल्या उत्कृष्ट व तत्पर कार्याबद्दल तसेच महत्त्वपूर्ण वेगवेगळ्या गुन्हेगारी कृत्यातील तपासकामात पोलिसांना आवश्यक ते सहकार्य केल्याबद्दल, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय मनोजकुमार लोहिया यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
              वृत्तांत असा की टेंभुर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पाटील मेळावा व कोविड वॉरियर्स सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बेंबळेचे पोलीस पाटील बिभीषण किर्ते यांचा विशेष सन्मान करण्यात आला व त्यांच्या कामाची प्रशंसा करण्यात आली.
       याप्रसंगी सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर विशाल हिरे, टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, परिसरातील 48 गावचे पोलीस पाटील बंधू-भगिनी व मान्यवर नागरिक उपस्थित होते.
            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा