*एटीम फोडणार्या आरोपींच्या चोवीस तासातच पोलीसांनी आवळल्या मुसक्या*
*आरोपी माढा तालुक्यातील मिटकलवाडीचे**
24 Taas News Maharashtra
अकलुज /कृष्णा लावंड
शंकरनगर येथे दि,१९ रोजी इडिकँश कंपनीचे एटीम मशिन फोडण्याचा प्रयत्न झाला होता.हा गंभीर गुन्हा करीत असताना पोलीसांना पाहुन पळुन गेलेल्या आरोपींच्या अथक परीश्रम घेवुन मोठ्या शिताफीने चोवीस तासाच्या आत मुसक्या आवळण्यास अकलुज पोलीसांना यश आले आहे,
याबाबत पोलीसांकडुन मिळालेली माहिती अशी कि,
अकलूज पोलीस ठाणे हद्दीत महर्षी चौक ते यशवंतनगर जाणारे रस्त्यावर कांतीलाल भवनसमोर निलेश आडाणे याचे मालकीचे व्यापारी गाळे आहेत.सदर गाळ्यामध्ये टाटा इंडिकंश कंपनीचे एटीएम मशिन आहे. सदर मशिन 19/12/2020 रोजी रात्री 03.00 वा.चे सुमारास फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती पोलीस ठाणे अंमलदार पोहेको / 382 चौधरी यांना मिळाली.त्यांनी तात्काळ नाईटराऊंड, नाकाबंदीचे कर्मचारी तसेच डीबी पथकातील कर्मचारी याना घटनेवाबत माहिती देवुन सदर ठिकाणी तात्काळ जाणेस कळविले. त्यानुसार नाईटराऊंडचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटना स्थळी पोहचले.त्या ठिकाणी पोहचाले असता एटीएम मशिन दोन अज्ञात इसम हे हातोडा व छनीच्या साह्याने फोडत असल्याचे दिसले.त्याच वेळी पोलीस आल्याचे चोरट्यांच्या लक्षात आले. पोलीस आल्याचे पाहुन सदर अज्ञात इसम छनी व हातोडा जागेवर टाकुन अंधाराचा फायदा धेवुन पळून जावु लागले. त्याचवेळी एक अज्ञात इसम रोडचे बाजुला कांतीलालभवन समोर मोटारसायकलवर बसलेला होता तो इसम ही मोटार सायकल चालु करुन तेथुन पळुन गेला. त्यापैकी इतर दोन इसमांचा पोलीसांनी पाठलाग केला असता ते स्वरुपनगर व शिवतेजनगर यांचे मध्ये असलेल्या ऊसामध्ये लपुन बसले.त्यानंतर पोलीसांनी व होमगार्डनी ऊसाला वेढा मारुन त्यांचेवर बारीक लक्ष ठेवले. ऊसात लपुन बसलेल्या चोरट्यांना बराच वेळ झाला असे वाटुन पोलीस गेले असावेत असा समज झाला. त्यामुळे ऊसातुन सकाळी 06. 00 वा. चे सुमारास व्यायामाचा बहाणा करुन ऊसाचे बाहेर आला व अंगातील टी शर्ट काढुन व्यायामाचा बहाणा करु लागला.पण पोलीसी नजरेने त्याला अलगत टिपले व पोलीस व होमगार्ड यांनी त्यास पकडून ताब्यात घेतले. त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव युवराज ज्ञानदेव सरगर वय 21वर्षे रा. मिटकलवाडी ता. माढा असे असून त्याचे पळुन गेलेले दोन साथीदार यांची नावे 2) विशाल रावसाहेब ठगिल वय 22 वर्षे 3) जालींदर दादा मोटे वय 19 वर्षे दोघे रा.मिटकलवाडी ता. माढा असे असल्याचे समजले. त्यानंतर पोलीसांनी आपला मोर्चा पळुन गेलेल्या दोन्ही आरोपींकडे वळविला. दोन्ही आरोपींची गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढली.तसेच सायबर क्राईम सोलापूर यांचे मदतीने मोबाईल लोकेशन वारंवार घेतले आणि त्यांना मोठ्या शिताफिने 24 तासाचे आत पकडण्यात पोलीसांना यश आले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेको / 409 क्षिरसागर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही निरज राजगुरु उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज उपविभाग अकलूज , भगवान निंबाळकर पोलीस निरीक्षक अकलूज पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली एएसआय पानसरे पोहेको/382 चौधरी पोहेको / 409 क्षिरसागर पोहेको / 102 घोगरे, पोहेकों / 1098 घाटगे, पोहेकॉ / 1624 पवार.पोना 1825 काशीद,पोना । 1659 शिदे,पोका / 362 शिंदे पोका/ 383 सुर्यवंशी ,पोकों/ 30 अमित यादव , पोकों/2216 अन्वर आता (सायबर पोलीस ठाणे), चालक पोलीस कॉन्टस्टेबल बारकुंड होमगार्ड नरेंद्र पाटोळे व सागर पवार यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा