इंदापूर तालुक्यात येथुन पुढे येणार्या सर्व निवडणुका काॅंग्रेस पक्ष स्वबळावर लढणार -अामदार संजय जगताप
इंदापूर प्रतिनिधी:-शिवाजी पवार
इंदापूर शहर व तालुक्यात येणाऱ्या अगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी तालुक्यातील संघटनेमध्ये फार मोठा बदल करण्यात आला असून
रिक्त असणारी पदे भरण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे पदाधिकारांच्या पक्षात निवडी देखील करण्यात आल्या आहेत. इंदापूर शहरात झालेल्या पक्ष मेळाव्यात सौ सीमा प्रशांत कल्याणकर यांची काँग्रेस पक्षाच्या महिला तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच इंदापूर शहरातील काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत व जुने कार्यकर्ते रमजान अब्दुल बागवान यांची इंदापूर शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
राहुल वीर यांची इंदापूर तालुका काँग्रेसच्या सरचिटणीसपदी तर बिजवडी येथील सामाजिक कार्यकर्ते महादेव लोंढे यांची इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या सचिव पदी निवड करण्यात आली आहे. विकास बनकर यांची युवक काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. निखिल निंबाळकर यांची इंदापूर तालुका युवक कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून इंदापुर शहरातील सुफियान जमादार यांची इंदापूर शहर युवक कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमदार संजय जगताप व महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले आहे.
इंदापूर शहरातील व तालुक्यातील सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष स्वबळावर आपली ताकत दाखवण्याचा प्रयत्न करेल इथून पुढच्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, येणार्या सर्व ग्रामपंचायती व सर्व सहकारी संस्था या मधील सर्व निवडणुका कॉंग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असून त्यासाठी पक्ष संघटनेतील कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. यावेळी बोलताना पुणे जिल्हा अध्यक्ष आमदार संजय जगताप म्हणाले की सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संघटना वाढीसाठी काम करावे जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचे काम आम्ही करू.
यावेळी प्रास्ताविक करताना इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वप्नील सावंत म्हणाले की तालुक्यात सर्व समाजाला बरोबर घेऊन संघटना वाढीसाठी प्रयत्न करण्यात येतील यावेळी इंदापूर तालुक्यातील सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी सूत्रसंचालन नरुटे यांनी केले तर आभार कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर यांनी व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा