Breaking

शुक्रवार, ४ डिसेंबर, २०२०

बिबट्या सदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात लिंबेवाडीतील युवकाचा मृत्यू**करमाळा तालुक्याच्या ग्रामीण भागावर भीतीचे सावट**


याा अगोदर बिबट्यानेप एका वासराचा जीव घेतला होता

*करमाळा तालुक्याच्या ग्रामीण भागावर भीतीचे सावट*

*करमाळा तालुका प्रतिनीधी- अतुल वारे पाटील*
  करमाळा तालुक्याच्या शेजारील आष्टी तालुक्यात बिबट्याने 3 नागरिकांचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच करमाळा तालुक्यातील लिंबेवाडी येथील एका युवा शेतकऱ्यावर पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता बिबट्याने हल्ला केल्याने जीव गमावण्याची वेळ आली आहे.कल्याण फुंदे असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
    याबाबत सविस्तर माहिती अशी की,करमाळा तालुक्यातील लिंबेवाडी येथील शेतकरी कल्याण फुंदे हे  गुरुवार दि 3 रोजी शेतीत पिकांना पाणी देण्यासाठी गेले असताना सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्यावर बिबट्या सदृश जंगली प्राण्यांने हल्ला केला व त्यांचे शीर धडापासून वेगळे केले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतामध्ये पालापाचोळा वर रक्त सांडलेले दिसले तर त्याठिकाणी चप्पल मिळून आली होती. बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर पिकांमध्ये कल्याण यांची मृत शरीर आढळून आले आहे. शरीरावरील जखमा व हल्ला पाहता जंगली प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तर परिसरात बिबट्याचा वावर असल्याबाबत चर्चा होती ती खरी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
   करमाळा तालुक्यातील भिलारवाडी येथील एका वासराचा मंगळवारी बिबट्याने बळी घेतला होता.तसेच तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाले होते. करमाळा तालुक्यातील शेतकरी वर्गात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
    गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्या करमाळा तसेच शेजारील तालुक्यात दिसून येत असूनदेखील वन विभाग सुस्तच असल्याचे दिसून येत आहे. ठोस कार्यवाही केली असती तर सामान्य नागरिकांना ,पाळीव प्राण्यांना जीवास मुकावे लागले नसते . आता तरी वन विभागाने जागे होऊन पिंजरे  लावून या नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गातून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा