Breaking

गुरुवार, २४ डिसेंबर, २०२०

विजया जगन्नाथ कुलकर्णी यांचे निधन



विजया जगन्नाथ कुलकर्णी यांचे निधन

     बेंबळे ।प्रतिनिधी         फोटो 

      बेंबळे येथील प्रतिष्ठित कुलकर्णी -बेंबळकर घराण्यातील श्रीमती विजया जगन्नाथ कुलकर्णी यांचे गुरुवारी, दिनांक 24 रोजी दुपारी अकरा वाजता निधन झाले त्या ५८ वर्षाच्या होत्या. त्यांचे पश्चात वृद्ध सासुबाई, दोन वीवाहीत मुली ,एक मुलगा, सून नातवंडे असा परिवार आहे . विशेष म्हणजे बेंबळे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व सोसायटीचे माजी चेअरमन स्वर्गीय जगन्नाथ दादा कुलकर्णी यांचे २८ नोव्हेंबर २० रोजी कोरोना मुळे निधन झाले .अवघ्या 25 दिवसातच त्यांच्या सुविद्य पत्नी विजयाताई कुलकर्णी यांचे आज 24 डिसेंबर रोजी निधन झालेआहे. पतीच्या निधनाचा आघात त्या सहन करू शकल्या नाहीत. एक महिन्यात पती-पत्नीच्या निधनामुळे कुलकर्णी- बेंबळेकर  घराणे अतिशय दुःखात बुडाले आहे. विजयाताई कुलकर्णी यांच्या निधनाबद्दल बेंबळे गावचे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. सायंकाळी त्यांच्या अंत्यसंस्कार समयी बेंबळे गावातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक नागरिक उपस्थित होते,या प्रसंगी कै. विजया कुलकर्णी यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा