दत्त नामाच्या गजरात शहाजीनगर रेडा गाव झाले चिंब : दत्त देवस्थान मध्ये दत्त जयंती सोहळा साजरा
काल्याच्या कीर्तनाने हरिनाम सप्ताह सांगता
रेडा (प्रतिनिधी):- इंदापूर तालुक्यातील शहाजी नगर येथील प्रसिद्ध असलेले दत्त देवस्थान येथे दत्त जन्मोत्सव सोहळा,काल्याच्या कीर्तनाच्या सांगते ने, व दत्त जन्माचे पाळणे गात,अन्नदान करत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या भजनाच्या निनादात साजरा करण्यात आला.शाहू शिक्षण संस्थेच्या प्रमुख विश्वस्त कोमलताई साळुंखे- ढोबळे यांच्या हस्ते मानाची आरती करण्यात आली.
दत्त देवस्थानच्या वतीने गेल्या सात दिवसांपासून गुरुचरित्र अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यात आला.या सप्ताहामध्ये भजन प्रवचन कीर्तन हरिपाठ गुरुचरित्र वाचन अखंड करण्यात आले.मंगळवार ( दि. २९ )रोजी पहाटेची ची महापूजा,जयभवानीगड विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले व त्यांच्या सुविद्यपत्नी,संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा श्रीमंत ढोले,युवा उद्योजक सौरभ शिंदे व अमृता सौरभ शिंदे,तसेच सिनेअभिनेते,दिग्दर्शक शिवकुमार गुणवरे व पूजा शिवकुमार गुणवरे यांच्या हस्ते पार पडली.देवस्थानच्या वतीने उपस्थितांचे स्वागत तानाजीराव गायकवाड,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांनी केले.पहाटेच्या प्रहरात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा नामजप करत अभिषेक पार पडला. शासनाचे नियम तंतोतंत पालन करून परिसरातील नागरिकांनी श्री दत्तगुरु राया यांचे दर्शन घेतले.
दुपारी श्री दत्त भजनी मंडळ वसंत गुलाब भजनी मंडळ यांचा भजन जुगलबंदीचा कार्यक्रम पार पडला.तदनंतर काल्याच्या कीर्तनाला सुरुवात करण्यात आली.ह-भ-प हनुमंत महाराज बोंडलेकर यांनी उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दहीभात या अभंगावर ती विवेचन केले.तर प्रथेप्रमाणे श्री गुरुदत्त राया चा पालखी सोहळा मंदिराला प्रदक्षिणा करून मंदिरात विसावला. पालखीचा मुख्य पादुका ठेवण्याचा मान नीलकंठ मोहिते व राणी नीलकंठ मोहिते यांना देवस्थानच्या वतिने देण्यांंत आला.उपस्थित असणाऱ्या शेकडो महिलांनी दत्त जन्माचे पाळणे गात दत्तजन्म सोहळा साजरा केला.
यावेळी इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील,इंदापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ,निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक बबनराव देवकर,तानाजीराव देवकर,वरीष्ठ पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर,यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
**
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा