Breaking

शनिवार, १६ जानेवारी, २०२१

कन्हेरगाव पोलिस पाटलानेच केला महिलेचा विनयभंग*



*कन्हेरगाव पोलिस पाटलानेच केला महिलेचा विनयभंग*

टेंभुर्णी (प्रतिनिधी)
माढा तालुक्यातील पासून जवळच असलेल्या कन्हेरगाव येथे शेतात गवत काढण्यासाठी गेलेल्या चाळीस वर्षीय महिलेचा गावातील पोलीस पाटील सदाशिव बाळासो पाटील याने विनयभंग केला असून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात याबाबत महिलेच्या फिर्यादीरून गुन्हा दाखल झाला आहे.

टेंभुर्णी पोलीस स्टेशन कडून सविस्तर मिळालेली अधिक माहिती अशी की,यातील फिर्यादी महिला ही कनेरगाव येथील रहिवासी असून ती आज दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान गावातील कनेरगाव-अकोले रोड जवळ असलेल्या  गोविंद ताठे यांच्या शेतात शेळ्यांसाठी गवत काढण्यासाठी गेली असता गावातील पोलीस पाटील, सदाशिव पाटील याने तेथे येऊन त्या महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिला तुला पाहिजे तेवढे पैसे देतो तू माझ्याबरोबर चल असे म्हणाला.नंतर पीडित महिला दाद देत नसल्याने तो निघून गेला. त्यानंतर या महिलेने  सदर घटना कनेरगाव येथील चौकांमध्ये वडाच्या झाडाच्या कट्ट्यावर बसलेल्या आपल्या  पतीस सर्व घडलेली हकीगत सांगितली व त्यानंतर या महिलेने आपल्या पतीसह व  नातेवाईकांबरोबर घेऊन टेंभुर्णी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली असून आरोपी सदाशिव पाटील याच्यावरती  भा. द .वि. कलम 354 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोनि राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ घोडके हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा