इंदापुर तालुक्यातील ४५ आरोग्य कर्मचारी यांना कोविडशिल्ड लस देण्यात आली ! कोरोनाची लस इंदापूरात देखील दाखल !
इंदापुर प्रतिनिधी :-शिवाजी पवार
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गेली १० महिन्यापासून कोरोनाने थैमान घातले होते सेरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया ही एक भारतीय संस्था आहे जी लसांसहित रोगप्रतिकारक औषधांची एक प्रमुख उत्पादक आहे.या कंपनीची स्थापना ही सायरस पूनावाला यांनी १९६६ मध्ये करण्यात आली होती. कोरोनावर पहिल्यांदाच प्रभावशाली लस सेरम इंस्टिट्यूट आँफ इंडिया यांनी शोधून काढली. ही लस पुण्यात तयार झाली असून ही लस मुंबई, सोलापूर, कोल्हापूर सातारा, सांगली जिल्ह्यासह सर्वच जिल्ह्यात वितरीत करण्यात आली आहे. आजपासून सर्वत्र कोविड लसीकरणाला सुरुवात झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालय व बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस टोचवून
लसीकरण मोहीम राबविण्यात आली. इंदापुरचा तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या हस्ते लसीकरणाचे उदघाटन करण्यात आले. इंदापूर तालुक्यातील बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी राजेंद्र अनपट यांना कोविडशिल्ड हि लस सर्वप्रथम देण्यात आली.
यावेळी सर्वात प्रथम कोरोनाची लस टोचण्याचा मान मिळाला म्हणूनच आनंद व्यक्त केला आज दिवसभरात ४५ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.एकनाथ चंदनशिवे यांनी सांगितले.
इंदापूर तालुक्यात २८ एप्रिलला पहिला रुग्ण आढळला होता.आजपर्यंत ४८०० च्या आसपास रुग्ण सापडले होते. आत्ता केवळ ८६ अक्टिव्ह रुग्ण तालुक्यात आहेत.
कोरोनाची लस आल्यामुळे साहजिकच रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होणार असल्याचे तहसीलदार मेटकरी यांनी सांगितले आहे.इंदापुर उपजिल्हा रुग्णालयात कोरोना पाँझिटीव्ह रूग्णावर उपचारासाठी विविध उपचार पद्धती उपलब्ध करण्यात आल्या होत्या. आता वॅक्सिन आल्याने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत असून ही नवसंजीवनीच म्हणावी लागेल असे वैद्यकीय अधिकक्ष डॉक्टर एकनाथ चंदशिवे म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा