Breaking

बुधवार, ६ जानेवारी, २०२१

भाजपा सहकार आघाडीच्या पुणे शहराध्यक्ष पदी सचिन दशरथ दांगट यांची निवड

                                                                                भाजपा सहकार आघाडीच्या पुणे शहराध्यक्ष पदी               सचिन दशरथ दांगट यांची निवड 

पुणे दि ४ :     
                                                                                                        वारजे येथील भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते तसेच स्वीकृत नगरसेवक सचिन दशरथ दांगट यांची भाजपा सहकार आघाडी च्या  पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे . पुणे शहर अध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक यांनी नियुक्तीचे पत्र सचिन दांगट यांना दिले .याप्रसंगी शहराध्यक्ष  संघटनमंत्री रवि अनासपुरे,  संघटन सरचिटणीस राजेश पांडे , सरचिटणीस गणेश घोष , दीपक पोटे , दीपक नागपुरे , प्रवक्ते धनंजय जाधव , विकास लवाटे ,दक्षिण भारतीय आघाडीचे राजेश पिल्ले,भाजपा शहर पदाधिकारी यांचेसह सहकार आघाडीचे कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते . 

 गेली ५ वर्षे  सचिन दांगट हे पुणे पालिकेचे स्वीकृत सभासद म्हणुन काम करीत आहेत .

२०१७ साली झालेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्र ३२ मधुन पराभवाला सामोरे गेल्यानंतर सातत्याने समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात ते कायम अग्रेसर आहेत .

 कोरोनाचे काळात सत्तेत नसताना हजारो लोकांना कोरडा शिधा वाटप , औषधे वाटप , ४००० परप्रांतीय नागरिकांना डॅाक्टर फिटनेस सर्टीफिकेट , पोलीस पासेस व्यवस्था असे  अनेक मदतीचे कार्यक्रम तसेच पक्षाचे दिलेले सर्व कार्यक्रम भाजपाचे वतीने घेतले आहेत . 
  यापुर्वी पुणे महानगरपालिका प्रभाग क्र ३२ चे भाजपाचे उमेदवार , सरचिटणीस खडकवासला विधानसभा मतदार संघ , स्वीकृत सभासद पुणे मनपा यांचेसह अनेक सामाजिक संस्थाचे पदाधिकारी म्हणुन त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे .
समाजोपयोगी आणि नाविन्यपुर्ण उपक्रम राबविणारा हाडाचा कार्यकर्ता म्हणुन सचिन दशरथ दांगट यांची ओळख आहे .                                                              .............................................



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा