Breaking

बुधवार, ६ जानेवारी, २०२१

उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा किनवट येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन


उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा किनवट येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन

नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

किनवट तालुका व परिसरातील सर्व गरीब गरजू रुग्णांसाठी गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत बुधवार दिनांक ६ जानेवारी रोजी सकाळी ९ ते  सायंकाळी ४ वाजे पर्यंत भव्य वैद्यकीय व दंत महारोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे 

या शिबिरात  स्किल मिक्स अंतर्गत आरोग्य समिती श्री गोविंदसिंगजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड येथील सर्व विशेष तज्ञ डॉक्टर्स तपासणीसाठी उपलब्ध राहणार आहेत.या शिबिरात हायड्रोसिल हर्निया अपेंडिक्स शरीरावर सर्व गाठींचे शस्त्रक्रिया व दंतचिकित्सा औषधोपचार मोफत करण्यात येणार आहे.तसेच या शिबिरात रुग्णांची रक्त तपासणी एच.एल.एल महालॅब्स अंतर्गत मोफत करण्यात येणार आहे. किनवट परिसरातील गरजू व गरीब रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.उत्तम धुमाळे यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा