Breaking

मंगळवार, २६ जानेवारी, २०२१

क्षितिज फाउंडेशनच्या वतीने स्त्री रोगविषयक कर्करोगावर फेसबुक लाईव्ह व्याख्यान - स्नेहल कदम



क्षितिज फाउंडेशनच्या वतीने स्त्री रोगविषयक कर्करोगावर फेसबुक लाईव्ह व्याख्यान - स्नेहल कदम

माढा / प्रतिनिधी - रेणुका रजपुत


माढा,
क्षितिज फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने महिला आणि बालकांच्या विकासाशी संबंधित विविध विषय तसेच "स्त्री रोगविषयक सगळ्या प्रकारच्या कर्करोगाची माहिती" या विषयावर अकोला येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ.हर्षवर्धन मालोकर यांच्या फेसबुक लाईव्ह व्याख्यानाचे आयोजन गुरुवारी 28 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता केल्याची माहिती क्षितिज फाउंडेशनच्या संस्थापक-अध्यक्षा स्नेहल सचिन कदम यांनी दिली आहे.

ग्रामीण व शहरी भागातील मुले व महिलांना आपल्या आरोग्याची व विविध प्रकारच्या रोगांची माहिती व्हावी आणि त्यावरील उपाययोजना लक्षात याव्यात या व्यापक उद्देशाने व्याख्यान ऐकणे व पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
https://www.facebook.com/kshitij.creaters/

क्षितिज फाउंडेशनच्या माध्यमातून आजतागायत संपूर्ण राज्यात महिलांचे  प्रश्न व शारीरिक समस्या याविषयी जनजागृती व प्रबोधनपर कार्यक्रम केले आहेत.विशेषत: स्त्रीयांची मासिक पाळी व घ्यावयाची काळजी आणि गैरसमज या विषयावर मोठ्या प्रमाणात सातत्याने प्रबोधन करण्याचे काम माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील पोलिस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या सुविद्य पत्नी स्नेहल कदम करीत आहेत.स्त्री सक्षमीकरणासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना वेळोवेळी पुरस्काराने सन्मानित केले आहे.

फोटो ओळी- अध्यक्षा स्नेहल कदम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा