Breaking

शुक्रवार, २९ जानेवारी, २०२१

*स्त्री रोगतज्ञ डॉ.संतोष अडगळेना सिझरच्या केसमध्ये नऊ हजाराची लाच घेताना महिलेनेच केले लाचलूचपत खात्यामार्फत रंगेहाथ आॅपरेशन.*



*स्त्री रोगतज्ञ डॉ.संतोष अडगळेना सिझरच्या केसमध्ये नऊ हजाराची लाच घेताना महिलेनेच केले लाचलूचपत खात्यामार्फत रंगेहाथ आॅपरेशन.*
 अरुण कोरे पत्रकार यांजकडून...
    कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संतोष अडगळे यांनी एका महिलेच्या सिझर आॅपरेशनसाठी दहा हजार रुपयांची मागणी केली होती.
    तडजोडी अंती नऊ हजार रुपये देण्याचे ठरविले.उपलब्ध माहिती नुसार सदर महिलेला गुरुवारी रात्री आॅपरेशनसाठी दाखल करण्यात आले होते.
        पैशाची मागणी केल्याने सदर महिलेच्या पतीने सोलापूरच्या लाचलूचपत प्रतिबंधक खात्यास कळविले होते.
     शुक्रवारी दुपारी साडेअकरा वाजता लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पुण्याचे अधिक्षक राजेश बनसोडे व अप्पर अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूरचे उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या निरिक्षणात पोलिस निरीक्षक कविता मुसळे,अंमलदार उमेश पवार,स्वप्नील सन्नके व सहकारी पथकाने नऊ हजार रुपये घेत असताना रंगेहाथ पकडले.
     कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पूढील तपास सुरूच आहे.
    गेल्या दहा वर्षांपासून डॉ.अडगळे कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात तळ ठोकून असून दहा वर्षांत केल्या नाहीत एवढ्या शेकडो महिलांच्या सिझर आॅपरेशन्स कोरोनो काळात व गेल्या दोन वर्षांत केल्या असून त्याबाबत वरिष्ठांकडील तक्रारी दाबून ठेवल्या असून डॉ.अडगळे यांनी त्यांच्या कुटुंबियांचे नांवें कोट्यावधींची वहाने व मुंबई,पुणे,बार्शी, उस्मानाबाद आदी ठिकाणी मोठी माया जमवली असल्याचे समोर आले आहे.
      त्यांच्या सहकाऱ्यांचेही धाबे दणाणले असून सर्वं भ्रष्टाचाराची पोलखोल होणार कां?असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जातो आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा