तुळजापूर- नगरपरिषद कार्यालय तुळजापूर येथे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला .
नगराध्यक्ष सचिन (भैय्या) रोचकरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला
तुळजापूर प्रतिनिधी /रुपेश डोलारे उस्मानाबाद
यावेळेला झालेल्या सत्कार समारंभ प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार सौदागर तांदळे ,उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक चंचला बोडके, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, राष्ट्रवादीचे नेते गोकुळ (तात्या) शिंदे ,मुख्याधिकारी आशिष लोकरे, नगरसेवक पंडित जगदाळे, अमर मगर ,विजय कंदले, नागेश नाईक अविनाश गंगणे ,व्यासपीठावर उपस्थित होते.स्वातंत्र्यसैनिक कोविड-19 मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या न .प कर्मचारी, तसेच सेवानिवृत्त कर्मचारी, नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3 यांना राज्यातील आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
पंतप्रधान आवास योजना अंतर्गत धनादेशाचे वाटप, अपंग निधी वाटप,बचत गट फिरता निधी वाटप,तसेच राष्ट्रमाता जिजामाता कन्या सन्मान योजना अंतर्गत 55 मुलींना निधी देण्या बाबतची घोषना करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी यांनी करून देताना कोविड-19 मध्ये कार्य करणाऱ्या सर्व पदाधिकारी ,कर्मचारी ,शिक्षक, सर्व विभागाचे प्रमुख तसेच सर्व जनतेचे ऋण व्यक्त करून नगरपालिकेने केलेल्या कार्याचा आढावा घेतला, यावेळेला तहसीलदार सौदागर तांदळे तांदळे , उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक चंचला बोडके मुख्याधिकारी आशिष लोकरे ,बाळासाहेब शिंदे (तात्या) शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले याच कार्यक्रमात कुमारी वरदायनी विशाल रोचकरी या विद्यार्थिनी प्रजासत्ताक दिनावर भाषण केले.
भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन शिवशंकर जळकोटे यांनी केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र कावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन नगरसेवक अमर मगर यांनी मानले या कार्यक्रमास नगरसेविका वैशाली तानाजी कदम, नगरसेवक विनोद खपले, किशोर साठे, औदुंबर कदम, विनोद पतंगे नाना लोंढे अमर हंगरगेकर, विशाल रोचकरी, आनंद कंदले,उपस्थित होते तसेच नगर परिषद कार्यालयाच्या अग्निशामक विभागात गुलाब बागेची उद्घाटन नगराध्यक्ष सचिन (भैय्या) रोचकरी मुख्याधिकारी आशिष लोकरे नगरसेवक पंडित जगदाळे, विजय (आबा) कंदले यांच्या हस्ते करण्यात आले 50 रोपट्यांचे लागवड करण्यात आली .
यावेळी श्रीनाथ शिंदे कार्यालयीन अधिक्षक वैभव पाठक अग्निशामक विभागाचे प्रमुख सोनी साहेब, राहुल मिटकरी, सुनील कदम, दत्ता साळुंखे ,राजेंद्र सातपुते, नंदू शिरसागर उपस्थित होते.
सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकतरे, जयजयराम माने ,वैभव पाठक, अंधारे, महादेव सोनार आदी सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
प
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा