*शिराळ ( टे ) ग्रामपंचायत वर धनशक्ती विरूद्ध श्री भैरवनाथ जनपरिवर्तन पॅनल तीन उमेदवार दणदणीत विजयी*
AJ 24 Taas News Maharashtra
शिराळ (टें) ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी गावातील नेत्यांना सोबत घेऊन निवडणुक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु बिनविरोध पॅनलमध्ये उमेदवार ठरवत असताना सर्वसमावेशक उमेदवार न घेता आपल्या सोईचे उमेदवार ठरवून राजकीय समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना समाजातील विविध घटकांना डावललं तसेच सामान्य जनतेला विचारात न घेताच परस्पर उमेदवार ठरवण्याचा प्रयत्न केला याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी गावातीलच युवक वर्ग एकवटला आणि फाॅर्म भरण्यास काही दिवस उरलेले असतानाच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.
श्री भैरवनाथ जनपरिवर्तन पॅनल च्या नावाने पॅनल स्थापन करून उमेदवार मैदानात उतरवले. कोणतही राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्दीनं निवडणूक लढविली.गावातील सगळे नेतेमंडळी आणि सत्ताधारी एका बाजूला एकवटलेले असताना देखील स्वाभिमानी युवा वर्गाने कोणत्याही दबावाला बळी न पडता निखराची झुंज दिली.धनशक्ती विरूद्ध जनपरिवर्तनाचा लढा उभारला त्यात वाॅर्ड क्र.1 मधुन रावसाहेब हनुमंत देशमुख(वॉर्ड क्र.1मधून सलग 3 वेळा निवडून येऊन विजयाची हॅट्रिक),सुलन कृष्णा लोकरे,रूपाली संजय भानवसे यांनी विजय संपादन केला.
वाॅर्ड 2 मधुन नरहरी जगताप, दिपाली गणेश लोकरे, पोपट शिंदे यांनी समोर तुल्यबळ उमेदवार असताना देखील निखराची लढत दिली परंतु सत्ताधाऱ्यांच्या धनशक्तीपुढे अवघ्या काही मतांनी पराभव स्वीकारावा लागला.
वाॅर्ड 3 मधून राजेंद्र बनसोडे,स्वाती विजय यादव आणि रेवंता बळीराम सोलनकर यांनी देखील शेवटपर्यंत निखराची झुंज दिली परंतु अवघ्या काही मतांच्या फरकाने विजयाने हुलकावणी दिली.
काही दिवसात उभा राहीलेला श्री भैरवनाथ जनपरिवर्तन पॅनल जरी संपुर्ण विजय मिळवू शकला नसला तरीही पहिल्या प्रयत्नात गावातून एकुण झालेल्या मताच्या अर्ध्याहून अधिक मते मिळवून जनतेचा विश्वास संपादन केला. या रणधुमाळीत गणेश सुरेश लोकरे,आण्णासाहेब पाटील,समाधान यादव, सिताराम भारत लोकरे,मारूती बबन जगताप,हिम्मत तळेकर,भैरवनाथ लोकरे,जयसिंग लोकरे,शंकर उगळे,कैलास देशमुख,बंडू मुळे,सागर लोकरे,नितीन लोकरे,गणेश लोकरे,अमोल सोलनकर,समीर पठाण,अमर मुळे,संजय थोरात,संजय लोकरे,सुधाकर बनसोडे, बबलु बनसोडे,गणेश पवार,गणेश नाळे, बंडू चव्हाण,अक्षय झिंगे,सोमनाथ लोकरे, नितीन जगताप,धवल जगताप,विशाल लोकरे,सुरज देशमुख,करण लोकरे,प्रवीण झिंगे,माऊली मुळे,सुनिल रेडे,शुभम लोकरे,महेश लोकरे,अनिल लोकरे,शंकर राजगुरू, सोमनाथ बनसोडे,रविंद्र लोकरे,अभिजित लोकरे, प्रमोद बनसोडे तसेच पॅनलमधील सर्व मित्रमंडळींनी परिश्रम घेतले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा