Breaking

रविवार, १७ जानेवारी, २०२१

मोडनिंबच्या समर्थ हाॅस्पिटलमध्ये कायायुर्वेद व केशायुर्वेद शिबिर संपन्न रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*:



*मोडनिंबच्या समर्थ हाॅस्पिटलमध्ये कायायुर्वेद व केशायुर्वेद शिबिर संपन्न रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

: *कुर्डुवाडी प्रतिनिधी*
     *मोडनिंब येथील "समर्थ हाॅस्पिटल"मध्ये रविवारी आयोजित करण्यात आलेल्या कायायुर्वेद व केशायुर्वेद मोफत तपासणी शिबिराचे उद्घाटन माजी सरपंच कैलास तोडकरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.*
       *या शिबिरास माजी सरपंच दत्ताबापू सुर्वे,सोमनाथ माळी, राहूल पाटील,ज्येष्ठ पत्रकार अरुण कोरे(कुर्डुवाडी) आदी मान्यवर उपस्थित होते.*
      *पुण्याचे केशायुर्वेद व कायायुर्वेद विभागाचे त्वचारोग विभाग प्रमुख डॉ.विवेक आंबरे यांनी रुग्णांची तपासणी करून योग्य ते मार्गदर्शन केले. समर्थ हाॅस्पिटलचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत कोल्हे, डॉ.निशा कोल्हे व सर्व कर्मचारी वर्ग यांनी शिबिराचे आयोजन निमित्ताने रुग्णांची विशेष देखभाल,तत्पर सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या.*
       *या शिबिरात डॉ.विवेक आंबरे यांनी रुग्णांनी कुठल्याही त्वचा रोगास न घाबरता मनोधैर्याने सामना केल्यास रुग्णास लवकरात लवकर आराम मिळून तो त्वरेने बरा होतो त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुविधाही उपलब्ध असल्याचे सांगितले.*
     *डॉ.प्रशांत कोल्हे यांनी सर्वच त्वचा संदर्भातील अॅलोपॅथीक, आयुर्वेदिक उपचार व अपुनर्भव चिकित्सा आहार,विहार, दिनचर्या विषयक माहिती एकाच छताखाली समर्थ हाॅस्पिटलमध्ये उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येईल असे ठामपणे सांगितले.*
   *डॉ.निशा कोल्हे व त्यांच्या सर्व कर्मचारी वर्गानी या शिबिराचे निमित्ताने रुग्णांची विशेष सेवा देऊन देखभाल ठेवल्याबद्दल सर्वं रुग्णांच्या वतीने सौ.अनिहा शेटे यांनी धन्यवाद देऊन आभार मानले.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा