Breaking

रविवार, १७ जानेवारी, २०२१

सहयोग सोसायटी टेंभुर्णी येथे शंभूशासन प्रतिष्ठान कडून राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा*



*सहयोग सोसायटी टेंभुर्णी येथे शंभूशासन प्रतिष्ठान कडून राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा*

" *आरटीओ चे सर्व नियम पाळण्याची घेतली शपथ* ".
शंभूशासन प्रतिष्ठान कडून सालाबाद प्रमाणे याही वर्षी अगदी जल्लोषात शंभूराज्याभिषेक सोहळा दिनांक 16 जानेवारी, शनिवारी साजरा केला गेला यंदाचे शंभूशासनचे चौथे वर्ष होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा मार्केट कमिटीचे संचालक दिलीपराव भोसले हे होते.
व प्रमुख पाहुणे टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे ए पी आय भोसले साहेब हे होते.

शंभूशासन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रज्वल दिपकराव पाटील यांनी प्रास्ताविक केले व शंभूशासन प्रतिष्ठानच्या कार्याचा उलगडा केला त्यानंतर प्रमोद ननवरे सर यांनी प्रतिष्ठानचे ध्येय उद्दिष्ट आणि सदस्यांनी काय कार्य केले पाहिजे याची सविस्तर माहिती सांगितली तदनंतर राज्याभिषेक सोहळा सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मंगलमय वातावरणात संपन्न केला.
शंभूशासन प्रतिष्ठानचे मार्गदर्शक अविनाश भोसले यांनी प्रतिष्ठानचे भविष्यातील वाटचाल कशी राहील व आतापर्यंतचे कार्य हे आपल्या भाषणात सांगितले.

 प्रमुख पाहुणे प्राचार्य महेंद्र कदम सर यांनी सर्व युवा पिढीला मार्गदर्शन केले व आपल्या भाषणातून त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास श्रोत्यापर्यंत पोहोचवला. व ते पुढे म्हणाले युवकांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा फेसबुक व सोशल मीडिया वापरण्यासाठी वेळेचे बंधन पाळावे जास्तीत जास्त माणसांना प्रत्यक्ष भेटून बोलावे,आजच्या काळातील व्यसन सोशल मिडीयाचा मोठ्या प्रमाणात वापर हाच आहे त्याचा अतिरेक वापर युवकांनी टाळावा.

 अध्यक्षीय भाषणामध्ये दिलीपराव भोसले म्हणाले की युवकांचे हे कार्य कौतुकास्पद आहे त्यांनी असेच कार्य चालू ठेवून गोरगरीब घटकांना मदत करण्याचा दृष्टिकोनातून प्रयत्न करावे.

व जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुरजाताई बोबडे यांनी सर्व युवकांचे कौतुक केले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी बंडूनाना ढवळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन बापू जगताप , मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने , मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील , अकोल्याचे नेते विनोद पाटील सर ,  अटकेपार झेंडा ग्रुप चे अध्यक्ष दयानंद नाना महाडिक , चॉईस बोअरवेल्स आणि डेव्हलपर्सचे शांतीलाल अण्णा बागवाले , युवा उद्योजक दिपकबापु पाटील , संतोषतात्या पाटील व योगेश दादा भोसले , रोटरी क्लबचे अध्यक्ष शब्बीर जागीरदार , माजी अध्यक्ष मुकुंद शेठ अटकळे , सचिव बंडूशेठ रावळ , बेंबळे गावचे युवा नेते यशवंत भोसले सर , नारायण भानवसे सर , अकोले गावचे युवानेते स्वप्नील पाटील , दत्ता पाटील , ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर भीमराव पवार , नितीन भोसले,यश बागवाले, वैभव भोसले , वैभव डरंगे , सचिन पराडे , महेश गवळी , अमोल सरडे सर , ओंकार रावळ , खुशाल फुगे , रोहित थोरात , रणजीत जगताप , दिग्विजय पाटील , सौरभ बागल , कुलदीप पाटील , विशाल गलांडे , वैभव लोंढे,अमोल शिंदे व सर्व पत्रकारबंधू ऊपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे तालुका अध्यक्ष हनुमंत तावरे यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा