डॉ यादव यांना पी एच डी मिळाल्याबद्दल एन पी कन्स्ट्रक्शनच्या वतीने सत्कार
पंढरपूर: प्रतिनिधी
गादेगाव ता पंढरपूर येथील डॉ. वाय डी यादव यांना नुकतीच पी एच डी पदवी मिळाली आहे. याबद्दल एन पी कन्स्ट्रक्शनच्या वतीने काँग्रेस सेवादल माजी जिल्हाध्यक्ष , सहकार शिरोमणीचे चे संचालक आणि उद्योजक नागेशदादा फाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या आपल्या गावचे सुपुत्र असलेले डॉ यादव यांना मुंबईच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्था या नामवंत विद्यापीठ ची ही पी एच डी पदवी मिळाल्यामुळे हा सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ रमेश फाटे, निवृत्ती पाटील, विनय शिंदे, गोपाळ कांबळे, यांच्यासह एन पी कन्स्ट्रक्शनचे सर्व सहकारी उपस्थित होते. गादेगांवचे वाय.डी. यादव यांची डॉक्टरेट पदवी ही सोलापूर जिल्ह्यासाठी गौरवास्पद असल्याने आपण हा त्यांचा सन्मान करीत असल्याचे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक उद्योजक नागेशदादा फाटे यांनी त्यांच्या सत्काराप्रसंगी सांगितले.
ही पी.एच.डी. (डॉक्टरेट) पदवी ‘माहिती तंत्रज्ञान आणि फळशेती: पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याचा अभ्यास’ या विषयावरील प्रबंध यादव यांनी टीस विद्यापिठाच्या ग्रामीण विकास विभागाला सादर केला होता. यासाठी त्यांना टीस विद्यापिठातील प्राध्यापक डॉ. पी. गोपीनाथ यांचे मार्गदर्शन लाभले. गादेगांवचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक द. शा. यादव (गुरुजी) यांचे ते चिरंजीव आहेत.
त्यांचे सर्वत्र अभिनंदन करून शुभेच्या देण्यात येत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा