घोटी येथे राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची संयुक्त जयंती साजरी
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
घोटी येथे राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.
प्रारंभी गावातील जेष्ठ मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रबोधनकार अतुल बेळेकर,प्रा.पंजाब शेरे यांनी आपल्या प्रबोधनातून राष्ट्रमाता माँ.साहेब जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर शिक्षण आणि संस्कार या विषयी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.आनंदराव सुरोसे तर यावेळी प्रमुख उपस्थिती प्रबोधनकार अतुल बेळेकर प्रा.सोनवणे प्रा.पंजाब शेरे अशोक कोसले,वामन वाढई,राम गरड अशोक सुरोशे सोमा पाटील,कार्यक्रमाचे आयोजक राजु सुरोशे पाटील,पदमाकर भवरे,संतोष मिराशे,कविराज भवरे,भिमराव पाटील,पोलीस पाटील प्रविन माथोरे,प्रकाश गरड पाटील,चंद्रशेखर गरड पांडूरग खरे,अनिल मुनेश्वर,जगदीश गरड पाटील यांच्या सह गावातील ग्रामस्थांची उपस्थिती होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा