शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त किनवट तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
बालाजी सिरसाट
हिंदुहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त जुन्या नगरपालिकेच्या प्रांगणात रक्तदान शिबिराचे आयोजन आणि शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाची उद्घाटकीय सुरुवात शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या हस्ते झाली.रक्तदान शिबिरास सकाळी १० वाजता सुरुवात झाली. असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान करण्यास गर्दी केली होती. या शिबिरास रक्तदात्यांचे रक्त घेण्यासाठी नांदेड ब्लड बँक या पेढीने आपल्या डॉक्टर रवी श्रीमंगले,संतोष देशमुख,राम महाजन आणि लता वाघोडे यांच्यासह शिवसैनिकांनी सहकार्य केले. यावेळी रक्तदान करणार्यांमध्ये तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे आणि शहरप्रमुख सुरज सातूरवार, संतोष येलचलवार आणी केशव डहाके अनुराधा डहाके या पती-पत्नीने रक्तदान केले. या समयी पोलिस प्रशासनातील अधिकारी पोलिस निरीक्षक मारुती थोरात यांची उपस्थिती होती तर सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कुमार यांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिरास समाजातील प्रत्येक वर्गातून आणि प्रत्येक राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांनी रक्तदान केल्याचे लक्षणीय चित्र या वेळी पहावयास मिळाले.स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या दैनिक सामना जाहिरात विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले, रक्तदान शिबिरात सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळूनच रक्तदान करण्यात आले, सदर शिबिर आणि जन्मदिन साजरा करण्यास किनवट येथील शिवसेना संघटक व्यंकट भंडारवार पंचायत समिती मा.उपसभापती गजानन कोल्हे ,माजी तालुका प्रमुख सुनील पाटील, मारुती संकुलवाड गजानन बच्चेवार,बजरंग वाडगुरे, कपिल रेड्डी, अतुल दर्शनवाड यांच्यासह शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा