इंदापूर मध्ये शिवशंभो प्रतिष्ठान च्या वतिने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी.
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त नेताजी नगर 40 फुटी रोड इंदापूर येथे नेताजी नगर च्या सर्व सदस्यांच्या उपस्थिती मध्ये जयंती निमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन करण्यात आले.
"यावेळी बोलताना शुभम पवार म्हणाले तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा " अशी घोषणा करून संपूर्ण युवाशक्तीला स्वातंत्र्यसंग्रामासाठी प्रेरीत करणारे व "जय हिंद " ही राष्ट्रिय घोषणा देणारे,भारतीय स्वांतंत्र्य लढ्याचे महानायक,आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज १२५ वी जयंती.
सशक्त भारत व सशक्त सेना या नेताजींच्या विचारांची प्रेरणा घेऊन या राष्ट्राची युवा पिढी नक्कीच सशक्त भारत घडवेल. भारतीय स्वांतंत्र्य लढ्याचे महानायक,आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज १२५ वी जयंती निमित्त नेताजींना विनम्र अभिवादन करतो व आजचे तरुण आपले आयुष्य जगत असताना सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचे नक्कीच अनुकरण करतील अशी आशा बाळगतो.यावेळी
पुणे जिल्हा अध्यक्ष रा.काॅ.पा प्रदिप गारटकर, भा.ज.पा इंदापूर शहर अध्यक्ष शकिल सय्यद,कॉंग्रेस पार्टी इंदापूर अध्यक्ष रमजान बागवान,जकिर काज़ी,अनिल राऊत,वसंतराव माळूंजकर,गणपत पवार,डॉ.दत्तात्रेय कांबळे,शकिल मोमीन,जाकिर मोमीन,राजू ताटे,प्रकाश पवार,सोमनाथ गवळी,अमोल खराडे,लोकसेवा युथ फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष गौरव राऊत,रोहन गाढवे,अजिंक्य ताटे,शोयब मोमीन,देवा अडागळे,अविनाश भोसले,इम्रान जमादार व शिवशंभो प्रतिष्ठान अध्यक्ष शुभम पवार हे सर्व उपस्थिती होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा