*MPSC च्या पूर्व परीक्षेसाठी जास्तीत जास्त विध्यार्थ्यांनी तयारी करावी:-नितीनभाऊ झिंजाडे*
*करमाळा तालुका प्रतिनिधी - अतुल वारे पाटील*
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या २०२० मध्ये होणाऱ्या पूर्व परीक्षा या काही कारणास्तव होऊ शकल्या नव्हत्या.या परीक्षा २०२१ मध्ये होणार आहेत त्यामुळे राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी करावी असे आवाहन राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीनभाऊ झिंजाडे यांनी केले आहे.याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी म्हटले आहे की,सदर MPSC परीक्षांचे तारखांचे नवीन वेळापत्रक जाहीर झाले आहे.नवीन वेळापत्रकानुसार १)राज्य सेवा पूर्व परीक्षा२०२०-ही ११ऑक्टोबर २०२० रोजी होणारी परीक्षा आता रविवार १४ मार्च२०२१ रोजी होणार आहे.
२)महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा२०२० ही १ नोव्हेंबर२०२० रोजी होणारी परीक्षा आता शनिवार २७मार्च २०२१ रोजी होणार आहे.तसेच ३)महाराष्ट्र दुय्यय सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा२०२० ही२२ नोव्हेंबर२०२० रोजी होणारी परीक्षा आता रविवार ११एप्रिल२०२१ रोजी होणार आहे.तरी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी याची दखल घेऊन आपली तयारी अजून चांगल्या रित्या सुरू करावी असे आवाहन श्री झिंजाडे यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा