Breaking

शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०२१

खूपसे - पाटलांच्या आंदोलना मुळे तालुका पंचायत मधील 23 कर्मचाऱ्यांची बिन पगारी....




खूपसे - पाटलांच्या आंदोलना मुळे तालुका पंचायत मधील 23 कर्मचाऱ्यांची बिन पगारी....

 श्रीगोंदा:नितीन रोही

माढा तालुका पंचायत समितीच्या आज पर्यंतच्या इतिहासा मध्ये प्रथमच गुरुवार दिनांक 25 फेब्रुवारी राेजी शेतकरी नेते अतुल खूपसे पाटील यांनी पंचायत समिती मध्ये सकाळी पावणेदहा वाजता येऊन वेळेवर न येणाऱ्या 23 कर्मचाऱ्याची बिन पगारी केली व त्यांच्या सेवा पुस्तकाला नोंद करण्यास भाग पाडल्याने पंचायत समिती मध्ये चांगलाच गदारोळ माजला हाेता .

राज्य शासनाने जिल्हा परिषदच्या सर्व कर्मचाऱ्यांना दर शनिवारी सुट्टी जाहीर केल्याने आठवड्यातील इतर पाच दिवशी मात्र सकाळी पावनेदहा ते सायंकाळी सव्वासहा वाजे पर्यत उपस्थीत रहाने बंधनकारक केलेले आहे . प्रहार संघटनेचे माजी पश्चीम महाराष्ट्र अध्यक्ष अतुल खुपसे पाटील हे आठवडी बाजार गुरुवार या दिवशी सकाळी पावनेदहा वाजता माढा तालुका पंचायत समिती कुर्डुवाडी येथील कार्यालया मधे आले असता बहुसंख्य कर्मचारी नसल्याचे दिसून आले . याबाबत त्यांनी माढा तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना जाब विचारला असता त्यांनी सांगितले की सर्व विभाग प्रमुखांना वेळेवर उपस्थित राहण्याच्या मागेच नोटीस काढली होती . यातूनही जे कर्मचारी हजर नसतील त्यांची वीणा पगारी करन त्यांच्या सर्विस बुक मध्ये याची आवश्यक नोंद करण्यात येईल असे उत्तर दिले . यानंतर सकाळी साडेदहा वाजण्याच्या पासून एक एक कर्मचारी येवू लागले . 
      माढा तालुक्‍यात विविध आंदोलने करण्यासाठी प्रसिद्ध असलेले अतुल खूपसे पाटील यांनी आंदोलन केल्याचे पाहून अनेक कर्मचारी एकमेकाला फोन लावून तात्काळ देण्याच्या सूचना केल्या . काही कर्मचाऱ्यांनी मागील दाराने उशिरा येऊन झटपट सह्या करुन आपल्या जागेवर बसले . तरीसुद्धा एकूण 23 कर्मचारी उशिरा आल्याचे निदर्शनास आले . बांधकाम विभागाचे उपअभियंता एन के नाईकवडे उपस्थीत नसल्याने यांचा प्रस्ताव सोलापूरला बांधकाम विभागाला पाठवण्यात आला . इतर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली ते पुढील कनिष्ठ अभियंता पि बी बारंगुळे बि व्ही रेपाळ एम एस जवळकाेटी आर व्ही डेंगळे के एन चव्हान के एच खटके एन सी खळदकर वाहनचालक ए आर लालसंगी परिचर डि एस अपराजित  अंगणवाडी पर्यवेक्षक ए एम मगर एल के पाटील ए ए खटके एन एल चव्हान वाय एस लाेखंडे एस के गडहिरे आर यू शिंदे एम एम बुधतराव डि जी वाघमारे एस डी आढाव डि डि चव्हान कृषी आधिकारी एम एम पवार याेगेश गाेटे बि टी रेपाळ
       अशा 23 अधिकारी यांच्या वरती गैरवर्तन व जिल्हा परिषदेचे सेवा शिस्त व अपील १९६४ मधील कलम ४ नुसार विनावेतन करून त्यांच्या सर्विस बुक मध्ये याची नोंद करण्यात आलेली आहे . या वेळी राणा वाघमारे दिपाली डिरे  गणेश ढोबळे बापू धोत्रे हर्षवर्धन पाटिल अतुल राऊत गणेश वायभासे,शरद एकाड,शुभम खटके कृष्णा खटके तेजस गाडे कल्याण गवळी शरद सपाटे अमोल गरड रोहन नाईकनवरे महेश घरबुडे विठ्ठल काणगुडे विजय खूपसे,भैय्या देवडकर अमीर मुलाणी काका कोळी दिलीप गडदे दीपक पिसाळ सुधीर लवटे आदी उपस्थित होते .

 एका डोळ्यात हसू तर दुसर्‍या डोळ्यात आसू,
 राज्य शासनाच्या यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत माढा तालुका पंचायत समितीला राज्यात तिसरा क्रमांक मिळालेला आहे . परंतु आज खुपसे यांच्या आंदाेलना मुळे वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली असता  कर्मचाऱ्यांच्या उपस्थित राहण्याचे भयाण वास्तव समोर आलेले आहे . कर्मचाऱ्यांची कामा बाबत भयान उदासीनता यामुळे पुन्हा एकदा दिसून आलेली आहे . तिसरा क्रमांक मिळाल्या बाबत गटविकास अधिकाऱ्यांचा काहीजण सत्कार करत हाेते  तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांवर अंकुश नसल्या मुळे अनेक कर्मचारी वेळेवर हजर नव्हते . यामुळे एका डोळ्यात हसू तर दुसर्‍या डोळ्यात आसू असंच म्हणण्याची वेळ माढा तालुका पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यावर आलेली आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा