माढा तालुक्यातील 82 ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच पदाच्या निवडी मंगळवारी 23 फेब्रुवारीला होणार....
बेंबळे। प्रतिनिधी।
माढा तालुक्यातील 82 ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच पदाच्या निवडी मंगळवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी होणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी एका आदेशान्वये कळवले आहे ,व त्या नुसार प्रत्येक गावच्या या पहील्या सभेसाठी अध्यासी अधिकारी नेमण्याची प्रक्रिया तालुकास्तरावर पूर्ण करण्यात आलेली आहे.
वृत्तांत असा की माढा तालुक्यातील 82 ग्रामपंचायतीच्या निवडणुकासाठी 15 जानेवारी रोजी मतदान व 18 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले होते. त्यानंतर 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान तालुक्यातील 82 ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच निवडी करण्याचा आदेश काढण्यात आला होता, तर प्रत्येक गावाच्या सरपंच पदाचे आरक्षण बुधवार दिनांक 27 जानेवारी रोजी काढण्यात आले होते. परंतु सोलापूर जिल्ह्यातील काही गावच्या नागरिकांनी सरपंच आरक्षणावर आक्षेप घेऊन मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. उच्च न्यायालयाने या सर्व आक्षेपांची चौकशी करून तातडीने सुनावणी करण्याचे आदेश निवडणूक आयोगास दिले होते . ही कारवाई पूर्ण करण्यासाठी काही कालावधीची आवश्यकता असल्यामुळे 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान च्या सरपंच उपसरपंच पदाच्या निवडी पुढे ढकलण्यात आल्या होत्या .त्यानुसार आता उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांची सुनावणी 20 ते 22 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होणार असल्यामुळे मंगळवारी, 23 फेब्रुवारी रोजी 82 गावच्या सरपंच उपसरपंच पदाच्या निवडी गावोगावी करण्याचा आदेश िल्हाधिकार्यांनी पारित केला असून त्यानुसार तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी तत्परतेने अंमलबजावणी केली आहे व गावोगावी अध्यासी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा