Breaking

रविवार, २१ फेब्रुवारी, २०२१

राष्ट्रीय समाज पक्षाचे जेष्ठ नेते मार्गदर्शक महादेव (आण्णा) सुळ यांचे निधन*



* *राष्ट्रीय समाज पक्षाचे जेष्ठ नेते मार्गदर्शक महादेव (आण्णा) सुळ यांचे  निधन*

करमाळा तालुका प्रतिनिधी
  राष्ट्रीय समाज पक्षाचे जेष्ठ नेते महादेव सूळ (वय 78) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
       धायखिडी ता.करमाळा येथील ते  रहिवाशी होते.2004 पासून  रासपचे संस्थापक महादेव  जानकर यांचे विश्वासू व निष्ठावंत कार्यक्रते होते. 
रासप च्या महाराष्ट्र भर प्रत्येक कार्यक्रमात तन-मनाने सतत अग्रेसर होते. त्यांच्या दुःखद निधनाने करमाळा रासप परिवार पोरका झाला आहे.त्याच्या पश्चात  पाच मुली,  एक मुलगा व जावाई नातवंड असा परिवार आहे. राष्ट्रीय समाज पक्ष तालुका.सरचिटणीस शंकर सुळ यांचे वडील तर धनगर धर्मपीठ जिल्हा संघटक बाळासाहेब टकले व पंचायत समिती करमाळा वरिष्ठ लिपिक जालिंदर कांबळे यांचे सासरे होते.  त्यांच्या अंत्यविधीसाठी विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा