*मोडनिंब ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत च्या सरपंच पदी सौ मीनाताई शिंदे तर उपसरपंचपदी दत्तात्रय सुर्वे*
मोडनिंब प्रतिनिधी /रत्नदीप रवींद्र पवार*
AJ 24 Taas News Maharashtra*
मोडनिंब ग्रामपंचायत निवडणुक निकालानंतर सर्वसाधारण महिला या सरपंच पदाच्या आरक्षणात सरपंच पदी सौ. मीना अनिल शिंदे यांची निवड करण्यात आली. तर उपसरपंच पदी दत्तात्रय सुर्वे यांची निवड करण्यात आली.यात मोडनिंब शहर विकास आघाडीचे निर्वीवाद वर्चस्व राहिले आहे. ही निवड मोडनिंब ग्रामपंचायतीच्या कार्यालयातील सभागृहात मंगळवारी पार पडली. यावेळी निवडणुक अधिकारी एस्.एन.मडके, साहाय्यक निवडणुक अधिकारी म्हणुन तलाठी महेश राऊत मोडनिंब गावचे ग्रामसेवक विजय काटकर यांच्या उपस्थितीत पार पडली.सरपंच पदासाठी सर्वसाधारण स्री या पदासाठी इच्छुक मीना अनिल शिंदे तर विरोधी योगिता संजीव शिंदे या होत्या.तर उपसरपंच पदासाठी दत्तात्रय सुर्वे यांच्या विरोधी अमर उत्तम ओहोळ हे इच्छुक होते.यावेळी सरपंचपदी मीना अनिल शिंदे तर उपसरपंच पदी दत्तात्रय सुर्वे यांनी बाजी मारली.यावेळी नवनिर्वाचीत सरपंच व उपसरपंच यांचा सदस्य व ग्रामस्थांनी शाल,श्रीफळ व पुष्पहार देउन नागरी सत्कार करण्यात आला. या निवडी घोषित होताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळुन आनंदोत्सव साजरा केला.यावेळी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल मोडनिंब पोलीस स्टेशनचे शिवाजी भोसले यांचा गुलाबपुष्प देउन सत्कार करण्यात आला.यावेळी सर्व सदस्यांना व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गावच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन असे सरपंच व उपसरपंचानी आपल्या भाषणात सांगितले. यावेळी मोडनिंब शहर विकास आघाडीचे कैलास तोडकरी, बाबुराव सुर्वे, उमा संस्थेचे अध्यक्ष व्हि.के.पाटील, सदाशिव पाटोळे, अनिल शिंदे, सत्यनारायण गिड्डे, नितीन गडधरे,शिवसेनेचे माउली पोळ, मोडनिंब शहर विकास आघाडीचे पदाधिकारी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा