Breaking

मंगळवार, २ फेब्रुवारी, २०२१

स्वाभिमानीचे रवींद्र गोडगे यांची साखर कारखाने तपासणी पथकात निवड**



*स्वाभिमानीचे रवींद्र गोडगे यांची साखर कारखाने तपासणी पथकात निवड*

*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*

शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे .यांची सोलापूर जिल्हा साखर कारखाने काटा तपासणी भरारी पथकामध्ये सदस्य म्हणून निवड झाली. त्याबद्दल त्यांचा सुधीर काळे पाटील,स्वाभिमानी शेतकरी संघटना करमाळा तालुका अध्यक्ष सुदर्शन शेळके, ता. युवा अध्यक्ष अमोल घुमरे, पक्ष अध्यक्ष बापू फरतडे,ता. उपाध्यक्ष तानाजी शिंदे, ता. युवा उपाध्यक्ष बापू वाडेकर, स्वाभिमानी नेते दीपक शिंदे, स्वाभिमानी नेते सोमनाथ अण्णा झोळ, प्रगतशील बागायतदार सुग्रीव आण्णा शेळके, प्रा जाधव उपस्थित होते. 
 यावेळी बोलताना रवींद्र गोडगे म्हणाले की, या संधीचा उपयोग शेतकरी हितासाठी आपण करू.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपण आजपर्यंत शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आलो असून साखर कारखान्यांमध्ये गैरकारभार आढळून आल्यास आपण नक्कीच आवाज उठवू असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा