Breaking

रविवार, १४ फेब्रुवारी, २०२१

माळशिरस जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षपदी मनोरमा लावंड



 माळशिरस जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षपदी  मनोरमा लावंड


माळशिरस प्रतिनिधी /भाग्यवंत नायकुडे

 मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ ब्रिगेड माळशिरस तालुका अध्यक्षपदी अकलूज येथील मनोरमा लावंड यांची शनिवार दि. 13 रोजी अकलूज येथे जिजाऊ ब्रिगेडच्या पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्षा सुरजा बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली यावेळी पंढरपूर विभाग कार्याध्यक्षा रत्नमाला  शिंदे, कार्याध्यक्षा प्रा मीनाक्षी जगदाळे पंढरपूर विभाग जिल्हा उपाध्यक्षा मनीषा जाधव, जिल्हा संघटक संगीता शिंदे या बैठकीस उपस्थित होत्या .

             माळशिरस तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या व अकलूज शहर जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांच्याही निवडी करण्यात आल्या व त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली माळशिरस तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या उपाध्यक्षपदी मनीषा संजय गायकवाड तर तालुका सचिवपदी मीनाक्षी दडस यांची नियुक्ती करण्यात आली अकलूज शहराध्यक्षपदी शुभांगी शिरसागर , अकलूज शहर कार्याध्यक्षपदी दुर्गा बुराडे ,अकलूज शहर कोषाध्यक्षपदी वर्षा गायकवाड ,अकलूज शहर संघटक म्हणून कल्पना चव्हाण, आशाताई सावंत ,सुवर्णा क्षीरसागर यांची निवड करून त्यांना पंढरपूर विभाग जिल्हा अध्यक्ष सुरजा बोबडे व इतर मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली .

         मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड ही महिलांची वैचारिक, आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण करणारी संघटना आहे 21 व्या शतकातील महिला दैववादी न होता विज्ञानवादी व्हायला पाहिजेत याचबरोबर प्रगतशील समाज घडविण्यासाठी विचाराने प्रगत झाले पाहिजे ही विचारधारा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत रुजवण्याचे कार्य जिजाऊ ब्रिगेड मार्फत केले जाते . याच अनुषंगाने आज माळशिरस तालुक्यातील जिजाऊ ब्रिगेडच्या नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडी केल्या आहेत

   सुरजा बोबडे ,पंढरपूर विभाग जिल्हा अध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड

जिजाऊ ब्रिगेडच्या माळशिरस तालुका अध्यक्ष पदाची जी जबाबदारी माझ्यावर सोपविलेले आहे यास प्रामाणिक राहून संघटना वाढीसाठी समाजातील शेवटच्या घटकातील महिलेपर्यंत पोहोचून संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार

मनोरमा लावंड,  तालुकाअध्यक्ष माळशिरस जिजाऊ ब्रिगेड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा