परिते सरपंचपदी हनुमंत अनंता भोसले
उपसरपंच पदी लक्ष्मण नवनाथ लांडे यांची बिनविरोध निवड.
सज्जन शिंदे
बेंबळे प्रतिनिधी:- परिते ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ज्योतिर्लिंग ग्रामविकास आघाडीला ११ पैकी ११ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले होते. सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीमध्ये परिते ग्रामपंचायतचे आरक्षण एस सी महिला प्रवर्गासाठी सुरुवातीला निघाले परंतु निवडून आलेल्या सदस्यांमध्ये एससी महिला सदस्य नसल्यामुळे जिल्ह्यातील आरक्षणाबाबतच्या प्रश्नांमध्ये परिते ग्रा.प. च्या आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागला. व एस सी पुरुष असे दुरुस्ती करून पुन्हा आरक्षण काढण्यात आले.
त्यामुळे एकमेव उमेदवार असणारे हनुमंत अनंता भोसले यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने यांची सरपंचपदी नेमणूक निवडणूक निर्णय अधिकारी श्री जानराव केली. उपसरपंच पदासाठी लक्ष्मण नवनाथ लांडे यांचा एकमेव अर्ज असल्याने उपसरपंच म्हणून लक्ष्मण नवनाथ लांडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी श्री जानराव यांनी केली. यावेळी ग्राम विस्ताराधिकारी एल बी गळगुंडे तलाठी सोनटक्के हे उपस्थित होते.
यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य मनीषा नवनाथ लामकाने,अर्चना छगन मुसळे,कलावती ज्ञानदेव झांबरे,भारत ज्ञानदेव माळी ज्ञानदेव गणपत जगताप,रूपाली दत्तात्रय धुमाळ धीरज ब्रह्मदेव लामकाने,मंगल ज्ञानेश्वर कुंभार,कांचनगंगा गोरख शेळक
पार्टी प्रमुख दादासाहेब देशमुख,गोरख दादा शेळके महादेव लांडे,भारत कुंभार महादेव मोरे बाळकृष्ण जगताप व सर्व ग्रामस्थांनी यांनी नूतन सरपंच उपसरपंचाचे अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा