सर्वांच्या सहकार्यामुळेच भाजपची मक्तेदारी मोडून काढून पदवीधर मधून विजय खेचून आणण्यात आपण यशस्वी झालो........
आमदार अरुण अण्णा लाड
शिक्षक व पदवीधर आमदारांना सर्वतोपरी सहकार्य करणार................. आमदार बबनदादा शिंदे
बेंबळे। प्रतिनिधी
महा विकास आघाडीचे सर्व पदवीधर व्यक्ती, कार्यकर्ते, वरिष्ठ पदाधिकारी व हितचिंतक यांच्या एकसंध प्रयत्नांमुळेच आजपर्यंत पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपची असलेली मक्तेदारी मोडून आपण विजय खेचून आणण्यात यशस्वी झालो, यामुळे शैक्षणिक ,सामाजिक व अन्य क्षेत्रातील पदवीधरांच्या व शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य पातळीवरील वरिष्ठ नेत्यांवर प्रसंगी दबाव आणून सर्व समस्यांचे निराकरण करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीन, असे प्रतिपादन पुणे पदवीधर मतदार संघातील नूतन आमदार अरुण लाड यांनी मतदारांच्या आभार दौर्या प्रसंगी टेंभुर्णी येथील रोटरी क्लब -हाँल मध्ये बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बबनदादा शिंदे होते .
जिल्हा परिषद सदस्य प्रतीनिधी शिवाजीराव पाटील ,बंडू नाना ढवळे, शिवसेना तालकाप्रमुख मधुकर देशमुख, शेकापचे बाळासाहेब पाटील ,सौदागर जाधव ,तालुका निरीक्षक आर डी पवार ,वैभव कुटे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते .
आमदार अरुण आण्णा लाड पुढे म्हणाले की पुणे पदवीधर मतदारसंघातील पाच जिल्हे व 58 तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व पदवीधर हे या मतदारसंघातील भाजीपाची मक्तेदारी संपवण्यासाठी पेटून उठले होते. कारण यापूर्वीच्या भाजपा आमदार चंद्रकांत पाटील यांनी पदवीधरांसाठी शुन्य कार्य केले होते व स्वतःची निष्क्रियता सिद्ध केली होती., म्हणून मतदारांना चीड निर्माण झाली होती. केंद्र सरकार कृषी कायदे देशावर लादत आहे , लाखो कोटीचे बँकेचे कर्ज बुडाले आहे परंतु शिक्षण क्षेत्रासाठी मात्र यांनी काहीही दिलेले नाही. आतापर्यंत माझ्याकडे 15000 समस्या आलेल्या आहेत, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व इतर सर्व श्रेष्ठी वर दबाव आणून ,तुमच्या सर्वांच्या एकजुटीने आणि ताकदीने आपण या समस्या नक्की सोडवून दाखवू असेही आमदार लाड यांनी याप्रसंगी सांगितले .
आमदार बबनदादा शिंदे अध्यक्षपदावरून बोलताना म्हणाले की राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आमच्या विनंतीला मान देऊन अरुण अण्णा लाड यांना पुणे पदवीधर मधून तिकीट दिले व पाचही जिल्ह्यातील महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तन-मन-धन एकत्र करून पहिल्याच फेरीमध्ये हजारो मतांनी लाड यांना विजयी केले. यापुढे शिक्षक आमदार व पदवीधर आमदार यांच्या पाठीशी आम्ही भक्कम पणे राहून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू. आमदार लाड यांच्या भावी कार्यास आ. बबन दादानी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पाटील यांनी केले. ते म्हणाले की स्वातंत्र्यपूर्व काळातील क्रांतिकारी घराण्यातील व्यक्तीला विधानपरिषदेत पाठवण्याचे भाग्य आम्हाला लाभले याबद्दल आम्ही महाविकास आघाडीच्या श्रेष्ठींचे मनःपूर्वक आभार मानतो. विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम यांनी शिक्षक, पदवीधर व शैक्षणिक क्षेत्र व संस्था यांच्यामध्ये येणाऱ्या प्रचंड अडचणी सविस्तरपणे विशद केल्या व कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय व विद्यार्थ्यांना कोणतीही फी न घेता शिक्षणाचा डोलारा कसा चालवायचा हा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार लाड साहेबांनी प्रयत्न करावेत , शिक्षण संस्थांना शासकीय अनुदान मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, आम्ही सदैव तुमच्याबरोबर राहू असे प्रतिपादन केले. याप्रसंगी याप्रसंगी तालुका निरीक्षक आरडी पवार यांनीही मनोगत व्यक्त केले .
महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला .या कार्यक्रमास माढा तालुक्यातील मानेगाव, माढा, कुर्डूवाडी, टेंभुर्णी, बेंबळे,व मोडनिंब आदी भागातून पदवीधर ,शिक्षक, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, गावोगावचे सरपंच , सर्व पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र मुळे यांनी केले व आभार प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा मतदार संघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी केले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा