*रुई येथे महिलेचा विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल*
रुई तालुका माढा येथे महिलेचा विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीत घडली.
याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्याकडून कडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की मंगळवार दिनांक १६/०२/२०२१ रोजी तीन वाजेचे दरम्यान फिर्यादी मनीषा अमित वाघमारे वय २८ राहणार रुई या आपल्या शेतामध्ये मकाचे पिकास पाणी देत असताना,त्यांच्या शेता समोर राहण्यास असणारे अमोल शिवाजी कोळेकर रा.रुई हे त्या ठिकाणी येऊन फिर्यादी शी जवळीक साधावी या हेतूने फिर्यादीचे मागे मागे येऊन फिर्यादीचा पाठलाग करून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यानंतर सदर गोष्टीबाबत फिर्यादी व फिर्यादीचे पती काल दिनांक १७\०२\२०२१ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अमोल कोळेकर यांचे चुलते पोपट रामचंद्र कोळेकर यांना सदर घटना सांगण्यासाठी त्यांच्या घरासमोर गेल्यावर फिर्यादी जात माहित असून सुद्धा फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ करत आमचा पोरगा असे कृत्य करणार नाही,तुम्ही इथून जावा पोलीस केस केली तर तुम्हाला बघून घेईल,अशी धमकी दिली म्हणून वगैरे मजकुराची तक्रार फिर्यादी मनीषा अमित वाघमारे यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये नोंदवले आहे आहे.
घटनास्थळी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे,सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शितोळे यांनी भेट दिली असून. सदर घटनेचा पुढील तपास करमाळा उपविभागीय पोलिस अधीक्षक डॉ विशाल हिरे हे करीत आहेत.
*टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्यात वाढ-*
टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील येणाऱ्या गावांमध्ये या दोन वर्षात काही ऍट्रॉसिटीच्या गुन्हे वगळता अनेक
ऍट्रॉसिटीच् गुन्हे खोटे होत असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
हे गुन्हे वाढ होणे म्हणजेच जातीय तेढ निर्माण होणे टेम्भूर्णी शहरांमध्ये व पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सर्वपक्षीय एकत्र येतात एकत्र काम करतात सर्व मिळून जयंती साजरी करतात. मात्र काही जातीय तेढ निर्माण करणाऱ्या समाजातील लोकांमुळे ॲट्रॉसिटी जे गुन्हे वाढू लागले असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किती खरे किती खोटे पाहून गुन्हे दाखल करण्याची सर्वसामान्य नागरिकांतून व सामाजिक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून मागणी होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा