Breaking

गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०२१

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद किनवट शाखेच्या वतीने महाविद्यालय सुरू करण्या बाबत निवेदन



अखिल भारतीय विद्यार्थी परिषद किनवट शाखेच्या वतीने महाविद्यालय सुरू करण्या बाबत निवेदन

नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

किनवट अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने महाविद्यालय सुरू करण्या बाबत
बळीराम पाटील महाविद्यालय येथील प्राचार्य डॉ.एस.के.बेंबरेकर यांना निवेदन देण्यात आले.

अ.भा.वि.प.गेली ७२ वर्षे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्यकरत आहे.जानेवारी महिना समाप्त झाला असून सर्व प्रकारचे दुकान बाजारपेठ मंदिरे चित्रपट गृह सुरू झालेले आहे.विद्येचे मंदिर असलेली महाविद्यालय अजून चालू झाले नाहीत.गेले कित्येक महिने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहे.तरी महाविद्यालय लवकरात लवकर विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात यावी यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने बळिराम पाटील महाविद्यालयास निवेदन देण्यात आले.

  यावेळी शहर अध्यक्ष चंद्रकांत निम्मानिवार शहरमंत्री अशितोष पाटील बेद्रे शहर सहमंत्री निकेतन सुरोसे संपर्क प्रमुख शुभम काळे प्रसिद्धी प्रमुख वैभव गरड चंद्रशेखर गरड प्रसाद पत्की अनुराग कुसणेनिवार राहुल मुनेश्वरइतर सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा