माळेगाव सरपंचपदी शिवसेनेचे भागवत कोकाटे ..
सज्जन शिंदे
बेंबळे प्रतिनाधी:- माढा तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेना नेते संजय कोकाटे पुरस्कृत स्वाभिमान ग्रामविकास आघाडीचे भागवत कोकाटे तर उपसरपंचपदी छाया लोंढे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
माळेगाव ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये शिवसेना नेते संजय कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमान ग्रामविकास आघाडीने ९ पैकी ६ जागांवर विजय संपादन करून सत्ता कायम ठेवली आहे. माळेगाव ग्रामपंचायतीत सरपंचपद सर्वसाधरणसाठी आरक्षित असल्याने स्वाभिमान ग्रामविकास आघाडीच्या प्रमुखांनी सर्वानुमते सर्वसाधारण ३ सदस्यांपैकी भागवत कोकाटे यांचा सरपंचपदासाठी तर सदस्या छाया लोंढे उपसरपंचपदासाठी यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. यामुळे भागवत कोकाटे यांची सरपंचपदी तर छाया लोंढे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जाधव एच डी व एम एन काळे यांनी काम पाहीले. सदरप्रसंगी दत्तात्रय साळुंखे, विजय गायकवाड, परमेश्वर गायकवाड, गणपत हुंबे, महावीर गायकवाड, सुदर्शन गायकवाड, बंडू लोकरे, सुखदेव हुंबे, संजय लोकरे, रामचंद्र पाटील, भारत (शेठजी) गायकवाड, किसन कोडग, रेवन कोडग, महादेव साळुंखे, गणेश मस्के, अंकुश गायकवाड, रमेश गायकवाड, प्रभाकर पाटील यांच्यासह नूतन सदस्य तुकाराम हरिदास गायकवाड, बळीराम लक्ष्मण अनंतकवळस, पूजा सुदर्शन गायकवाड, आनंदा कांतीलाल लोंढे हे उपस्थित होते. तसेच यावेळी प्रतिष्ठित मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नूतन सदस्यांचा नागरी सत्कार ग्रामस्थांच्यावतीने करून गावातून फटाक्याची आतिशबाजी व गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा