Breaking

शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१

उमरा येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा



उमरा येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

उमरा ता.लोहा येथे कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय हे खऱ्या अर्थाने युगनायक होते जगाच्या इतिहासात स्वतःच्या कर्तुत्वाने वेगळा ठसा उमटवून स्वराज्यातून सुराज्य निर्माण करणारा महापराक्रमी शीलवान बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज हे असे युगनायक होऊन गेले की त्यांच्या जन्माला आज 391 वर्ष झाली तरीही त्यांचे कार्य,पराक्रम, आणि विचार यांची प्रेरणा अजूनही जिवंत आहे.या थोर राजाची जयंती उमरा येथे साजरी करण्यात आली...

प्रारंभी गावातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख मा.नागोराव पाटील उमरेकर यांनी आपल्या भाषणातून छत्रपती शिवराय  यांच्या जीवन चरित्रावर शिवकालीन स्वराज्य आणि संस्कार या विषयी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक मा.तेजेराव पाटील सिरसाट,शिवसेना तालुका उपप्रमुख मा.नागोराव पाटील उमरेकर,सचिन पाटील सिरसाट, चेतन पाटील सिरसाट,संभाजी ब्रिगेडचे तालुका सचिव पवन पाटील सिरसाट,दयानंद पाटील पुयड, शिवमावळा बालाजी सिरसाट युवक काँग्रेसचे अविनाश पाटील उमरेकर शिवसेनेचे गोविंद पाटील सिरसाट दाजीराव सिरसाट,राजू माली पाटील सिरसाट,मनोहर सिरसाट,रामेश्वर सिरसाट,तिरुपती सिरसाट शैलेश सिरसाट श्रीनिवास उमरेकर,नितीन सिरसाट आनंदा जोगदंड,सुरेश खोसडे सुनिल सोनटक्के मारोती वडजे,शंकर बोडके,माधव मोरे,तेजेराव सिरसाट बालाजी शिंदे,महेश सिरसाट,बंडू ईबीतवार,कृष्णा सिरसाट,वैभव सिरसाट,मारोती सिरसाट यांच्या सह गावातील नागरिक उपस्थित होते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा