*डेरला गावाला भेट देऊन पथकानी केले समाधान व्यक्त*
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
लोहा --तालुक्यातील .डेरला येथे जि.प.च्या " सुंदर माझे गाव या उपक्रमा अंतर्गत पथक प्रमुख मुदखेड येथील गट विकास अधिकारी श्री जाधव , विस्तार अधिकारी (पं)श्री के.एच.गायकवाड ,श्री वाघमारे या आलेल्या पथकानी भेट देऊन ग्राम पंचायत स्थरावरील स्वच्छता ,घरकुल,स्वच्छतागृह,सांडपाणी व्यवस्था ,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ,स्वच्छालयाचा वापर , लागवड -संगोपन, निधी लावितरण,रस्ते,नाल्या,आदिसह विविध विकास कामाची विस्तार अधिकारी तथा ग्राम पंचायतीचे प्रशासक(पं)श्री डी.पी.धर्मेकर ,स्थानिक ग्राम विकास अधिकारी श्री अभिजीत भोसले यांचे कडून घेऊन स्वच्छतेचे अग्रदुत संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन करून विविध शैक्षणिक उपक्रमाची माहिती राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक पंडित पवळे,शिक्षक उत्तम क्षीरसागर,दत्तात्रय पांचाळ ,सौ.मनिषा पवार,सौ.दिपाली सनपुरकर,सौ.ज्योती हंबर्डे यांचे कडून घेऊन समाधान व्यक्त केले .यावेळी शिक्षणप्रेमी व्यक्तीमत्व तथा माजी सरपंच नारायण पाटील कळकेकर यांना मान्यवराकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या .यावेळी युवा नेतृत्व कामाजीराव कदम,तंटामुक्तीचे अध्यक्ष उत्तमराव शिंदे,विठ्ठल सोळंके,माधवराव शिंदे ,सखाराम शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा