*पूजा चव्हाण प्रकरण; एक पथक बीडला तर दुसरे यवतमाळला*
गेवराई तालुका प्रतिनिधी- नवनाथ आडे
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली असून पथके तपासासाठी बीड, पुणे आणि यवतमाळ या ठिकाणी रवाना झाली आहेत. ही पथके बीड जिल्ह्यात पूजाच्या गावी तसेच यवतमाळ येथे जिल्हा रुग्णालयात तपासणी करणार आहेत . पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आता पुणे पोलिसांनी तपास मोहीम हाती घेतली आहे. पोलीस महासंचालकांनी पुणे पोलीस आयुक्तांना तपासाचे आदेश दिल्यानंतर पोलीसांकडून मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
वानवडी पोलिसांचं एक पथक सोमवारी यवतमाळमध्ये दाखल झालं आहे. पूजा चव्हाण हिने यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्याची माहिती मिळतेय.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा