*भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांच्या विरोधात तक्रार*
गेवराई प्रतिनिधी- नवनाथ आडे-
बंजारा समाजाच्यावतीने परळी शहर पोलिसांत भाजपाचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. बंजारा समाजाविषयी जातीवाचक आपमानास्पद शब्दप्रयोग केल्याने समाजाची बदनामी झाली आहे, असं सांगत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भातकळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी या तक्रारी अर्जात केली आहे.
मुळची परळी तालुक्यातील पुजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात भाष्य करतांना विविध प्रसिद्धी माध्यमांवर भाजपाचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी बंजारा समाजाविषयी आपमानजनक वक्तव्य केले. समाजाच्या भावना दुखवणारे शब्दप्रयोग करून राठोडगिरी म्हणत समाजाची बदनामी होईल, असे जातीवाचक शब्द उद्गारून समाजाची बदनामी केली. त्यांच्या या वक्तव्याने आमच्या भावना दुखावल्या असून अतुल भातखळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा