शिवजयंती उत्सव सामाजिक उपक्रमाने साजरी करणार- सुनील ठोसर
गेवराई प्रतिनिधी- नवनाथ आडे
गेवराई तालुक्यात शेतकरी बांधवासाठी हमखास शासन दरबारी लढा देत त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे गेवराई तालुक्यातील रयत शेतकरी संघटनेचे राज्याचे प्रदेश सरचिटणीस तथा युवा शेतकरी सुनिल ठोसर आजवर व यापुढेही लढा देणारे एकमेव शेतकरी युवक आहेत.या युवकाने मागिल आठ दिवसापासून रयतेचे खरे राजे होऊन गेलेले छञपती शिवाजी महाराज यांची जयंती शेतकरी बांधवाच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय घेऊन ही जयंती साजरी करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे.ही जयंती गेवराई माजलगाव रोडवरील हरकी निमगाव माऊली फाटा या निसर्गरम्य व धार्मिक ठिकाणी शेतकरी बांधवानच्या उपस्थितीत १९ फेब्रुवारी शुक्रवार रोजी सायंकाळी ६ वा.घेण्याचा निर्णय घेतला आहे.युवा शेतकरी सुनिल ठोसर यांनी गेवराई तालुक्यात प्रथमच रयतेचे होऊन गेलेले खरे राजे छञपती शिवाजी महाराज यांची जयंती शेतकरी बांधवाच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय घेतल्याने ठोसर यांचे गेवराई विधानसभा मतदार संघातून सध्या कौतुक केले जात आहे.
गेवराई तालुक्यातील युवक शेतकरी तथा रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनिल ठोसर यांनी या वर्षी वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्याचा व आगळा वेगळा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.या शिव जन्मोत्सव सोहळा निमित्ताने शेतकरी बांधवाच्या अडचणी ऐकून त्या शासन दरबारी सोडवण्याचा निर्णय घेतला आहे.रयतचे खरे राजे होऊन गेले ते म्हणजे छञपती शिवाजी महाराज या महा पुरुषाच्या जयंती निमित्त सुनिल ठोसर यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.आजवर विविध पक्ष संघटना व राजकीय नेते हे धुमधडाक्यात शिवजयंती साजरी करतात.माञ गेवराई येथील शेतकरी बांधवासाठी वर्षाचे बारा महिने शेतकरी बांधवासाठी शासन दरबारी धाऊन येणारे ठोसर यांनी शेतकरी बांधवाच्या उपस्थितीत यंदा शिव जन्मोत्सव सोहळा साजरा करण्याचे ठरविले आहे.
गढी माजलगाव रोडवरील हरकी निमगाव माऊली फाटा येथे धार्मिक ठिकाणी शेतकरी बांधवानच्या उपस्थितीत यंदा शिव जन्मोत्सव सोहळा साजरा करण्याचे ठरविले असुन या निमित्ताने त्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.शुक्रवारी सांयकाळी ६ वा.शेतकरी बांधवाच्या उपस्थितीत हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.यावेळी रयत शेतकरी संघटनेचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष बापूसाहेब देशमुख,कार्याध्यक्ष तय्यब पटेल,विभाग प्रमुख नयानाताई गवळी,प्रमुख पाहुणे म्हणून युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अतुल खुपसे,टायगर ग्रुपचे प्रदेशाध्यक्ष तानाजी जाधव,प्रदेश सरचिटणीस सुनिल ठोसर,पञकार कैलास हादगुले,जिल्हाध्यक्ष सुधिर भोसले आदि मान्यवरांच्या उपस्थितीत हा शिव जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास गेवराई तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे अवाहन गेवराई तालुका प्रमुख राम नवले,बाबुराव भोईटे,गुरु हतागळे,अर्जुन चाटे,गणेश ढाकणे,विष्णू काकडे,माऊली गलांडे,शाईन पठाण आदिने केले आहे.या शिव जन्मोत्सव सोहळा निमित्ताने गेवराई तालुक्यातील शेतकरी बांधवाच्या अडी अडचणी जाणून घेऊन त्या शासन दरबारी निपटरा करण्यासाठी रयत शेतकरी संघटना पाठपुरावा करणार आसल्याचे सुनिल ठोसर प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा