*जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड जेऊर च्या वतीने जगद्गुरू संत तुकोबाराय जयंती उत्साहात साजरी*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
जेऊर जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड च्या वतीने जगद्गुरू तुकोबाराय यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .
यानिमित्ताने ह भ प हरिदास गुंडगिरी महाराज यांनी तुकाराम महाराजांची जीवनगाथा आपल्या कीर्तनातून मांडली .आपल्या कीर्तनात ते म्हणाले की, तुकोबारायांनी आपल्या कीर्तनातून बहुजन समाजाला अनिष्ट रूढी परंपरा यातून बाहेर काढून एक नवा आदर्श विचार देण्याचा प्रयत्न केला. तुकोबांचे समाज उद्धाराचे कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल.तुकोबांची जयंती साजरी करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड यांचे कौतुक केले.
यावेळी बाळासाहेब झोळ , जालिंदर कांडेकर, दादा गावडे, ज्ञानदेव माने, अरुण कुभकोणी, लक्ष्मण बेरे, दत्तात्रय निर्मळ , पोपट गावडे,तसेच जिजाऊ ब्रिगेड चे सदस्य प्रियांका गावडे, सविता गावडे, पूनम कदम, प्रियांका खटके,तब्बसूम काझी, सुजाता जाधव, पल्लवी शिंदे, आरती घाडगे, सत्यभामा मोहिते,विद्या चौधरी,उषा होळकर, शैला घाडगे, अनुसया महामुने, मुक्ताबाई कांडेकर, मनीषा वनवे, शकुंतला जाधव, सुवर्णा घाडगे, माया कदम,अलका जाधव, विमल शिंदे, मनिषा पवार, संगीता गावडे, संपदा शितोळे, गंगा लोंढे नितिन खटके पुणे विभागीय कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड पांडूरग घाडगे बालाजी गावडे निलेश पाटील अत्तुल निर्मळ राकेश पाटील सुहास शिंदे पिंटू जाधव हेमा शिंदे बंडू मोहिते शुभम कोठावळे बाळासाहेब घाडगे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा