*गढी येथील नवोदय विद्यालयात 12 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह*
*****************************
*जिल्हाधिकारी- रवींद्र जगताप यांची भेट*
******************************
*गेवराई प्रतिनिधी- नवनाथ आडे*
गेवराई ( प्रतिनिधी ):- गेवराई तालुक्यातील गढी येथे असलेल्या नवोदय विद्यालयातील 12 विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने दखल घेत तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहे.
नवोदय निवासी विद्यालयास जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी तातडीने भेट दिली यावेळी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची पाहणी करून त्यांनी संबंधित यंत्रणांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
नवोदय विद्यालयात 102 विद्यार्थी निवासी पद्धतीने शिक्षण घेत असून त्यासह 27 कर्मचारी देखील आहेत येथे असणाऱ्या विद्यार्थ्यांसह अध्यापक, कुटुंबीय आणि कर्मचारी यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले.
असून त्यामध्ये प्राचार्य आणि अध्यापक या दोघांसह कुटुंबातील दोन सदस्य, एक आचारी व एक मेस कर्मचारीदेखील कोरोना बाधित आढळून आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा