*बीड जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार व कोचिंग क्लासेस 31 मार्च पर्यंत बंद*
*गेवराई प्रतिनिधी- नवनाथ आडे*
बीड जिल्ह्यातील कोरोनाविषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आज दिनांक 5 मार्च रोजी नवीन आदेश जारी केले आहेत.
आजपासून दिनांक 31 मार्च 2021 पर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार, कोचिंग क्लासेस ( दहावी बारावी वगळून) बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
बीड जिल्ह्यातील सर्व यात्रा, मोर्चे,आंदोलने, उपोषण यांना देखील बंदी घालण्यात आली आहे.
सोशल डिस्टंसिंग आणि मास्कचा वापर करून भाजीपाला व फळ विक्रीला परवानगी देण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा